आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demand Of Tapasi Pannu, Said 'censor Board Should Make Compulsory The Disclaimer Of Domestic Violence In Films Showing Domestic Violence'

'थप्पड' च्या निमित्ताने तापसी पन्नूची मागणी, सेंसर बोर्डाने घरगुती हिंसाचार दाखवणाऱ्या चित्रपटांमध्ये डिस्क्लॅमर बंधनकारक करावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अपकमिंग चित्रपट 'थप्पड' ला प्रमोट करत असलेल्या तापसी पन्नूने सोशल मीडियावर नवी मोहीम सुरु केली आहे. तिची इच्छा आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने चित्रपटांमध्ये दारू, सिगारेट आणि प्राण्यांप्रमाणे घरगुती हिंसाचाराशी निगडित एक डिस्क्लॅमरदेखील लावले पाहिजे. तिने याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "चापटीवर डिस्क्लॅमर येणे एक छोटीशी गोष्ट आहे का ? जर नाही तर पिटीशन साइन करा."

व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहे की, तापसी पन्नूचे पात्र आपल्या पतीला कामाबद्दल बोलताना पाहात आहे. याचदरम्यान पतीच्या हातात दारूचा ग्लास दिसतो आणि डिस्क्लॅमरच्या भीतीने तित्याच्याकडून तो ग्लास परत घेते. पुढच्याच सीनमध्ये पती जेव्हा सिगारेट ओढणार असतो, तेव्हाव्ही डिस्क्लॅमरच्या भीतीने ती सिगारेटदेखील परत घेते. हे पाहून पतीला राग येतो आणि तो तापसीच्या पात्राला चापट मारण्यासाठी हात उचलतो. यावर ती प्रश्न करते की, या सीनसाठी कोणतेही डिस्क्लॅमर नाहीये ? त्यानंतर तिने ऑडियंसला अपील केले की, जर त्यांनाही वाटते की, चापट मारणे छोटीशी गोष्ट नाही तर त्यांनी सेंसर बोर्डाला ही मागणी करावी की, महिलांविरुद्ध हिंसाचार दाखवणाऱ्या चित्रपटांमध्ये डिस्क्लॅमर बंधनकारक करावे. 

28 फेब्रुवारीला रिलीज होत आहे चित्रपट... 

अनुभव सिन्हाच्या दिग्दर्शनात बनलेला 'थप्पड' चित्रपट 28 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. चित्रपटात तापसी एका अशा मुलीची भूमिका साकारणार आहे, जी पतीने केवळ एक चापट मारल्यानंतर घटस्फोटाची मागणी करते.