आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसुखाची मागणी लाचच, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यात फेब्रुवारीत करण्यात आला बदल; ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मध्यंतरी राज्यात महिलांना कामाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करण्याचे प्रकार वाढले. हे लक्षात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यात (एसीबी अॅक्ट) यापुढे महिलेला शरीरसुखाची मागणी करणे लाचच राहील, असा बदल फेब्रुवारीत करण्यात आला. त्यानंतर राज्यातील पहिला गुन्हा ठाण्यातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


मुंबई येथील एसीबीच्या सांख्यिकी अधिकाऱ्याने राज्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कायद्यात “अन ड्यू अॅडव्हांटेज आॅफ एनी थिंग’ असा नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्याने शरीरसुखाची मागणी करणे हा यापुढे लाचेचा गुन्हा ठरणार आहे. या प्रकरणी सापळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याला किमान १ ते ३ वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

 

कल्याण-डोंबिवली पालिकेतील लिपिक अटकेत
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील हे प्रकरण आहे.  पालिकेने अवास्तव मालमत्ता कर आकारल्याचा एका महिलेचा दावा होता. परंतु, तो कर कमी करून देण्यासाठी  पालिकेतील लिपिक-संगणकचालकाने शरीरसुखाची मागणी केली होती. तिने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून दोघांतील संवाद रेकाॅर्ड केले आणि कारकुनाला अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...