आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत यांच्या राम मंदिर मागणीला दानवेंचा छेद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -  अयाेध्येत राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात केली होती. मात्र, कायदा करण्यासाठी संसदेत आवश्यक दोनतृतीयांश बहुमत नसल्यामुळे त्याबाबत आताच सांगता येणार नाही, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरसंघचालकांच्या मागणीलाच छेद दिला आहे. पक्ष संघटन व बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी दानवे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी नागपूरला आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

   
दानवे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर व्हावे या बाजूनेच आम्ही आहोत. पण, त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. कायदा करण्यासाठी आवश्यक बहुमत नसल्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागतो हे पाहावे लागेल. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजप नेते प्रमोद महाजन यांनी ठरवलेल्या फार्म्युल्यानुसारच होईल, हेही दानवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दानवेंच्या वक्तव्यानंतर नवा वाद होण्याची शक्यता आहे.

 

विदर्भासाठी हवी सहमती   
विकासाच्या दृष्टीने मोठ्या राज्यांचे विभाजन करून लहान राज्ये निर्माण व्हावीत, अशी भाजपची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक छोटी राज्ये निर्माण करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीतही आमची हीच भूमिका आहे. मात्र, काही जणांचा याला विरोध आहे. त्यामुळे वाद निर्माण होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होताच आम्ही स्वतंत्र विदर्भ निर्माण करू, असे दानवे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...