आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहारे आणणारा प्रसंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील डोंगरसेवली येथे माझे मोठे साडू वास्तव्यास आहेत. दोघेही पती-पत्नी शिक्षक असून त्यांच्या राहत्या घरासमोरच एक तीन मजली इमारत त्यांनी विकत घेतली होती. मे महिन्यात आम्ही त्यांना भेटण्यास गेलो होतो. त्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. जुन्या बांधकामामुळे इमारतीत अंधारून आल्यासारखेच वाटायचे. प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी खिडक्या-व्हेंटिलेशनचे काम चालू होते. पहिल्या मजल्यापासून तिस-या मजल्यापर्यंत साडूंनी आम्हाला सगळी इमारत दाखवली. सर्वत्र सामान, लाकडे, विटा-दगड पसरलेले होते. इमारत खूपच जुनी पण भव्य होती. वापर नसल्याने खूपच भकासही वाटत होती. काही रूममध्ये अंधार असल्याने भीती वाटत होती.

तेथे आमचा मुक्काम 4-5 दिवस होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने एके दिवशी पप्पा (साडू) आणि मी त्या इमारतीत तिस-या मजल्यावर झोपण्यासाठी गेलो. हातात मिणमिणता कंदील आणि अंथरूण-पांघरूण बरोबर होते. आम्ही गच्चीवर झोपलो. मला मात्र झोप येईना. अंधार आणि किर्र आवाजाने भीतीचे सावट चेह-यावर पसरले होते. रात्रीचे बारा-साडेबारा वाजले असतील. घराच्या पाय-यांवर बुटांचा टप-टप आवाज येऊ लागला. सुरुवातीला आवाज कमी होता, नंतर मात्र तो वाढत गेला. कोणीतरी जिना चढून आल्यासारखा भास झाला. मी घाबरून तोंडावर पांघरूण घेऊन झोपलो. मनातल्या मनात ‘राम-राम’ असे म्हणत होतो. मी सांडूना उठवले. कोणीतरी आल्याचे सांगितले. कंदिलाची वात वर करून बिडी पेटवत ते खोकलले. शेवटी मला भास झाला असेल, असे म्हणून ते झोपी गेले. काही वेळाने तोच आवाज येऊ लागला. मी आता मात्र गर्भगळीत झालो. मी त्यांना परत उठवले व राहत्या घरात चलण्याचा आग्रह धरला. अंधारात कोणी दिसत नव्हते. कोण आहे हे पाहण्याची हिंमत न करताच घरी जाऊन दरवाजा बंद केला.