Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Dengue Fever Symptoms Treatment Causes information in marathi

तुम्हाला डेंग्यू झाला आहे हे कसे ओळखावे, का होतो डेंग्यू?

हेल्थ डेस्क | Update - Aug 06, 2018, 03:35 PM IST

पावसाळ्यात डेंग्यूच्या पेशंट्सची संख्या जलद वाढत आहे. सामान्यतः ताप आल्यावर आपण घरातच औषध घेऊन ही समस्या दूर करण्याचा प्

 • Dengue Fever Symptoms Treatment Causes information in marathi

  पावसाळ्यात डेंग्यूच्या पेशंट्सची संख्या जलद वाढत आहे. सामान्यतः ताप आल्यावर आपण घरातच औषध घेऊन ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु योग्य वेळी डेंग्यूवर उपचार केले नाहीत तर हे जीवघेणेही होऊ शकते...


  का होतो डेंग्यू?
  डॉक्टर सांगतात की, एडिस डास चावल्यामुळे डेंग्यूचा ताप येतो. या आजारांवर कोणतीच लस उपलब्ध नाही. यामुळे या डासापासून दूर राहणे हीच डेंग्यूपासून दूर राहण्याची चांगली पद्धत असल्याचे डॉक्टर मानतात. एडिस डास दिवसा चावतो. यामुळे घरात डास होऊ देऊ नका. झाडांच्या कुंड्या, टायर किंवा कूलरमध्ये जमा झालेल्या पाण्यात डास जमा होतात. यामुळे घराच्या आजूबाजूला डास होऊ देऊ नका.


  डेंग्यूचे 10 संकेत
  1. जास्त ताप

  अचानक खूप जास्त ताप आला आणि दीर्घ काळ टिकून राहिला तर डेंग्यू होऊ शकतो.


  2. लाल रॅशेस
  ताप येण्यासोबतच शरीरावर लाल रंगाचे डाग पडले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.


  3. तीव्र वेदना
  डेंग्यूचा ताप आल्यावर शरीरामध्ये तीव्र वेदना होतात. विशेषतः डोके आणि सांधेदुखीचा जास्त त्रास होतो.


  4. भूक न लागणे
  तापासोबतच भूक नसेल, काहीही खाण्याची इच्छा होत नसेल तर हा डेंग्यू असू शकतो.


  5. तोंडाची चव
  ताप उतरल्यानंतर तोंडाची चव कडवट झाली. काहीही खाल्ले तरी चांगले लागत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.


  6. चक्कर येणे
  डेंग्यूच्या तापाने शरीर कमजोर होते. अशा वेळी चक्कर येण्याची समस्या होऊ शकते.


  7. उलट्या
  डेंग्यूमुळे पचनक्रिया खराब होते. वारंवार उलट्या होणे किंवा जुलाब होणे सुरू होते.


  8. प्लेटलेट्स
  डेंग्यू झाल्यावर ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद कमी होते. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन संकेत...

 • Dengue Fever Symptoms Treatment Causes information in marathi

  9. रक्तदाब 
  हा आजार बळावल्याने उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांना दाखवा. 

 • Dengue Fever Symptoms Treatment Causes information in marathi

  10. बेशुद्ध 
  डेंग्यूचा ताप वाढवल्यावर चक्कर येण्यासोबतच बेशुद्ध होण्याची समस्या होऊ शकते. 

Trending