आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात डेंग्यूची लागण; 268 पैकी 92 नमुने पाॅझिटिव्ह तर 15 जणांना स्वाइन फ्लू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव शहरासह जिल्हाभरात डेंग्यूने गेल्या तीन महिन्यांपासून पाय पसरले अाहेत. खासगी रुग्णालयात शेकडाेंच्या संख्येने डेंग्यूसदृश रुग्ण उपचार घेत अाहेत. त्यापैकी घाटी रुग्णालयाने अातापर्यंत २६८ पैकी ९२ नमुने पाॅझिटीव्ह ठरवले अाहेत. एकीकडे डेंग्यूची समस्या असताना अाता त्यात स्वाइन फ्लूची भर पडली अाहे. जिल्हाभरात अातापर्यंत १५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू अाेढवला अाहे. जळगाव शहरात चाैघांपैकी दाेघांचा मृत्यू झाला अाहे. संसर्गजन्य अाजारापासून नागरिकांनी स्वत: काळजी घेणे गरजेचे झाले अाहे. 


संसर्गजन्य अाजारांचा फैलाव झाल्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयातील अाेपीडी वाढली अाहे. सर्दी, खाेकला, अंगदुखी या अाजारांसाेबतच टाइफाइड, न्युमाेनियाच्या रुग्णांची संख्याही वाढलेली अाहे. डायबेटिस, रक्तदाब, किडनी व अन्य अाजारांच्या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे अशा रुग्णांना संसर्गजन्य अाजार झाल्याची माहिती पुढे येत अाहे. तीन महिन्यांत साथीच्या अाजारांमध्ये वाढ झाली असून डेंग्यूचा फैलाव वाढत चालला अाहे. जळगाव शहरासाेबतच ग्रामीण भागातून उपचारासाठी दाखल हाेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण माेठ्या प्रमाणात असल्याचे चित्र अाहे. 

 

चार दिवसांत अाणखी ३५ नमुने केले रवाना 
जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस अाल्यानंतर अाराेग्य यंत्रणा जागी झाली अाहे. गेल्या चार दिवसांत संकलित केलेले रक्ताचे ३५ नमुने अाैरंगाबादला तपासणीसाठी पाठविण्यात अाले. शहरातील ९२ जणांचे नमुने पाॅझिटिव्ह अाल्यामुळे पालिका प्रशासनाचा डेंग्यूचे रुग्ण नसल्याचा दावा खाेटा ठरला. जळगाव शहरात २६८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नाेंद जिल्हा मलेरिया विभागाकडे झाली अाहे. जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या अादेशानुसार संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी अाैरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात अाले हाेते. ९२ नमूने पाॅझिटिव्ह अाले अाहेत. 

 

स्वाइन फ्लूची लक्षणे 
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंशापेक्षा जास्त असणे, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखीचा समावेश असतो. 

 

 यांना अधिक धाेका 
ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत, अशांनाही हा त्रास उद्भवतो. तीव्र हृदयविकार. तीव्र मूत्रपिंडाचे विकार. तीव्र यकृताचे विकार, तीव्र न्युरॉलॉजिकल विकार असलेल्या रुग्णांना याचा त्रास अधिक हाेण्याचा धाेका संभवताे. 

 

स्वाइन फ्ल्ूची धास्ती
अातापर्यंत जळगाव जिल्ह्यात १५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले अाहे. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला अाहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या ८ पैकी ६ जणांचे वय हे ४५ वर्षांपेक्षा जास्त अाहे. 

 

स्वाइन फ्लूमुळे दीड महिन्यात दाेघांचा मृत्यू 
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दीड महिन्यात जळगाव शहरातील चाैघांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस अाले अाहे. यात शिव काॅलनी व महाबळ राेडवरील विद्युतनगरातील रुग्ण दगावल्याची नाेंद करण्यात अाली अाहे. याशिवाय कालिंकामाता मंदिर परिसर व रामानंदनगर परिसरातील लक्ष्मीनगरातील दाेघांची प्रकृती सुधारली अाहे. डेंग्यूपाठाेपाठ स्वाइन फ्लूचा फैलाव वाढल्याने चिंतेचे वातावरण अाहे. स्वाइन फ्लूची लागण असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांवर तातडीने उपचार करण्यात अाले अाहेत. याशिवाय बहिणाबाई उद्यान परिसरातील एका हाॅस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील दाेघांना न्युमाेनियाचा त्रास हाेत असून व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

 

असा हाेताे प्रसार 
विषाणू तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. 

 

नागरिकांनी काळजी घ्यावी 
संसर्गजन्य अाजारांचा फैलाव हवेतून, खाेकण्यातून हाेत असताे. शिंकताना व खाेकताना नाकावर रुमाल अथवा पेपर ठेवावा, वापरलेले पेपर नष्ट करावे. शिंकल्यानंतर किंवा खाेकल्यानंतर हात स्वच्छ पाणी व साबणाने धुवावे. सर्दी, खाेकला व ताप असलेल्या व्यक्तींनी प्रवास टाळावा. अाजारी व्यक्तीपासून लांब रहावे. उपचारानंतर अाराम न मिळाल्यास पुन्हा डाॅक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावे. - डाॅ. बबीता कमलापूरकर, जिल्हा अाराेग्याधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव 

 

बातम्या आणखी आहेत...