आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक गाढ झाेप 30% चिंता कमी करू शकते! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका : जर तुम्ही दरराेज गाढ झाेप घेत असाल, तर आपल्या ३०% चिंंता आपाेआप कमी हाेतात, असा निष्कर्ष कॅलिफाेर्निया विद्यापीठाच्या नव्या संशाेधनातून हाती आला आहे. सकाळी ताजेतवाने वाटते आणि आपली वैचारिक क्षमता टिकून राहते. सद्य:स्थितीत ७ काेटी अमेरिकन (यामध्ये ४ काेटी ज्येष्ठ नागरिक) निद्रानाशाचे बळी ठरले आहेत.


यूसी बर्कलेमधील मज्जातंतुशास्त्र आणि मानसाेपचार विशेषज्ञ, प्राेफेसर मॅथ्यू वाॅकर यांच्या मते, गाढ झाेपेमुळे शरीर आणि मेंदू पूर्णपणे शांत हाेऊन पूर्णतया शिथिल हाेताे. मेंदूतील साऱ्या रज्जूंचे जाळे गाढ झाेप पुन्हा व्यवस्थित करते आणि रात्रभरात चिंतेचे प्रमाणदेखील कमी करते. साेप्या शब्दांत सांगायचे तर, गाढ झाेप शरीर आणि मेंदूची दुरुस्ती करते. गाढ झाेप येण्यासाठी आपल्या आहारातील सवयीसाेबतच दिनचर्यादेखील बदलावी लागेल.


नेचर ह्यूमन बिहेवियर नावाच्या जर्नलमध्ये या आठवड्यात एक शाेधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्यानुसार झाेप आणि चिंता यामध्ये सर्वाधिक मजबूत मज्जातंतूंचे कनेक्शन असते. लेखक एटी बेन सायमन यांच्या संशाेधकांच्या पथकाने १८ युवकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. हे युवक झाेपेची वेळ टाळून मेंदूत भावनिक कल्लाेळ माजवणारे व्हिडिअाे पाहत असत. झाेपेची वेळ टळून गेल्यावर ते झाेपण्याचा प्रयत्न आणि दिवसा नाेकरी करीत असत. त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग करून चिंतेचा स्तर माेजण्यात आला. तेव्हा प्रिफ्रंटल कार्टेक्स (मेंदूतील विचार करण्याचा भाग) जवळपास बंद झाल्याचे आढळले. हाच भाग सामान्यत: आपल्या चिंता नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असताे. या प्रयाेगानंतर पुन्हा याच युवकांना गाढ झाेप घ्यायला लावण्यात आली. सकाळी मेंदूतील तरंगांचा इलेक्ट्राेड माेजण्यात आला. त्या वेळी त्यांच्या चिंतेचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे आढळले. गाढ झाेपेमुळे मज्जारज्जूंमध्ये सुधारणा झाल्याचे दिसले. तिसऱ्या प्रयाेगात अाॅनलाइन अभ्यास करणाऱ्या सर्व वयाेगटांतील २८८० लाेकांची चार दिवस चाचणी घेतली गेली. झाेप आणि चिंता याचा स्तर माेजण्यात आला त्या वेळी सर्वांमध्ये चिंतेचा स्तर ३०% ने कमी झाल्याचे दिसून आले. शांत, तल्लख राखण्यासाठी गाढ झाेपेची आवश्यकता असते हे यातून स्पष्ट झाले.
 
 

बातम्या आणखी आहेत...