आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅसो वर्षभरात केवळ 8 विमाने बनवते;  संरक्षण मंत्रालयाच्या समितीचा रफालच्या फाइलवर प्रश्न 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सच्या डॅसो कंपनीकडून लढाऊ विमान रफालच्या खरेदीसंबंधीचा अहवाल उजेडात आला आहे. हा अहवाल संरक्षण मंत्रालयाच्या समितीने तयार केला आहे. डॅसो एव्हिएशन कंपनी वर्षभरात ८ विमानांची निर्मिती करू शकत असल्यास ती भारताला वेळेवर सर्व विमाने कशी देऊ शकेल? असा प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समितीने अहवालात सविस्तर टिप्पणी केली आहे. १२६ रफाल विमानाच्या सौद्यानुसार पहिले विमान करारापासून ३६ व्या महिन्यात, तर १८ वे विमान ४८ व्या महिन्यात मिळणे अपेक्षित होते. अर्थात ती वेळेवर मिळण्याऐवजी आता तर ५३ वा महिना उजाडणार आहे. मग हा सौदा आणीबाणीच्या स्थितीत झाला असे कसे म्हणता येऊ शकेल? डॅसो या उत्पादक कंपनीच्या हवाल्यानेच समितीने काही प्रश्न मांडले. एक वर्षात कंपनी ८ विमानांची निर्मिती करण्यास सक्षम आहे. कंपनीकडे ८३ विमानांच्या ऑर्डरचा बॅकलॉग आहे. त्याची पूर्ततेसाठी कंपनीला आणखी दहा वर्षे लागतील. मग भारताला वेळेवर विमानांचा पुरवठा कशी काय करेल? असे समितीने म्हटले आहे. 

 

सध्याच्या अटी चांगल्या 
रफाल सौद्यासाठी अटीत सुधारणा केल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. अर्थात संपुआ सरकारच्या तुलनेत सध्याच्या अटी पारदर्शक व चांगल्या आहेत. परंतु तीनसदस्यीय समितीने नवीन अटी आधीच्या तुलनेत चांगल्या नसल्याची टिप्पणी केली आहेसमितीच्या तीन सदस्यांनी विमाने वेळेवर मिळत नसल्यास बँक गॅरंटी व इतर तरतुदींवरही लेखी प्रश्न उपस्थित केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रानुसार या प्रश्नाचे विधी मंत्रालय व अर्थ मंत्रालयानेदेखील समर्थन केले होते. 

 

संरक्षण मंत्रालयाला विचारणा 
डॅसो वेळेवर पुरवठा करू शकत नसल्यास करारामध्ये दंडात्मक कारवाईची काय तरतूद केलीय? संरक्षण मंत्रालयाला डॅसोच्या थकीत मागणीबद्दल कल्पना तरी आहे का? वुल्फगँग मॅक्स रिचर्ड मिराज सौद्यात सहभागी आहे, याची मंत्रालयास माहिती आहे? 

 

डॅसो एव्हिएशनला प्रश्न.. 
- डॅसोची एक वर्षात किती विमान निर्मितीची क्षमता आहे? 
- भारतासाठी विमान तयार करणाऱ्या कंपनीची असेंब्ली लाइनची क्षमता किती? ही असेंब्ली लाइन केव्हापासून सुरू आहे? 
- कंपनीला रफाल विमानांची जगभरातून ऑर्डर आहे. ही थकीत मागणी ८३ होती. सध्या किती आहे? 
- डॅसो भारताला ३६ विमानांचा वेळेवर पुरवठा करू शकेल का? 
- ही प्रश्नावली २० जानेवारी रोजी डॅसोच्या ३ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. आतापर्यंत उत्तर पाठवलेले नाही. 
 
 

बातम्या आणखी आहेत...