आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरच्या पत्नीचे दिरासोबत होते अनैतिक संबंध, ती म्हणालची नवरा मुलाला आपल मानत नाही, नंतर दोघांनी मिळून घेतला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहरसा(बिहार)- दंत चिकित्सक किशोर कुमार भास्कर यांच्या खूनाचे गुपित पाच दिवसानंतर सहरसा पोलिसांनी उलगडले. डॉक्टरच्या पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून खूनाची प्लॅनिंग केली होती. पोलिसांनी पत्नी नेहाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बमबम चौधरीला अटक केले. आरोपी बमबम मृत डॉक्टरचा आत्येभाऊ आहे. तो अनेक दिवसांपासून डॉक्टराच्या घरातच राहात होता. या अनैतिक संबंधाची माहिती डॉक्टरांना लागली होती, त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बमबमला घरातून हकलून लावल होत. त्यानंतरही नेहा आणि बमबमचे संबंध सुरूच होते, आणि याचा शेट डॉक्टरांच्या अंताने झाला. 19 मार्चला डॉक्टरांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.

 

9 दिवसांपूर्वी झाला होता 11 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
10 मार्चला डॉक्टरच्या 11 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर बमबम खूप रागात होता, त्याला माहित होते की, तो मुलगा त्याचा होता. नेहा नेहमी बमबमला सांगायची, डॉक्टर मुलाला लाइक करत नाहीत. नेहा मुलाच्या मृत्यूनंतर माहेरी गेली होती, तिथे बमबम आला आणि नेहासोबत मिळून खूनाचा प्लॅन आखला.

 

मोबाईलच्या तपासात पोलिसांच्या हाती आले यश
एस.पी. खूनाचा उलगडा करण्यासाठी डी.एस.पी. प्रभाकर तिवारी यांच्या नेकृत्वात टीम बनवली. त्यानंतर त्यांनी तांत्रीक बाजुने तपास सूरू केला. घटनेच्या नंतर डॉक्टरांच्या वडिलांनी प्रतिस्पर्धी दंत चिकित्सक डॉ. अजहरवर संशय घेतला होता, पण पोलिसांच्या तपासात त्यांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे हाती लागले नाही. त्यानंतर कॉल डिटेल आणि मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे खूनाचा उलगडा झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...