आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळ, वातावरणानुसार सांभाळा चहाचा गोडवा, स्टँडर्ड मापात दिवसात तीन कटच ठीक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, जीएमसी अकोला - Divya Marathi
डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, जीएमसी अकोला

अकोला : घराघरातली सकाळची सुरुवात, कॉलेजचा कट्टा, कामगारांचा ब्रेक, ऑफिसच्या मिटींग, वाटेत भेटलेला मित्र किंवा प्रवासात थांबलेली बस दिवसभरातील अशा विविध प्रसगांमध्ये मुल्य येते ते वाफाळलेल्या कपभर चहाने. होय ! बाहेरून आलेला चहा देशात स्थिरावला. काचेच्या पेल्यातून खापराच्या भांड्यात, चिनीमातीच्या कपात, पुन्हा काच, स्टील, प्लास्टिक आणि आता कागदाच्या कपात. चहाचं रुप, चव, प्रकार आणि भांडी बदलत गेली. पण निमित्त आणि महत्त्व आजही भारतीयांच्या 'रगारगात' कायम आहे.

जगभरातील चहा उत्पादक पर्यायाने चहाप्रेमी देशांमध्ये १५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. ऊर्जा देणारे पेय म्हणून चहाकडे पाहिले जाते. चहातून शरीराला साखर आणि दूध मिळाल्याने मेंदूला तरतरी येते. त्यामुळे अनेकांना चहा घेतल्याशिवाय मानसिक, शाारीरिक कष्टाचे कामही करता येत नाही. अगदी अाबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या याा पेयामुळे देशात कोट्यवधी लोकांना कमी भांडवलात रोजगार मिळाला आहे. दुधाच्या चहाबरोबरच कोरा चहा, पुदीना, लेमन, तुळस, आले, विलायचीचा चहा आदी विविध प्रकारचे चहा हवामानाच्या बदलानुसार शरीरासाठी फायद्याचे ठरतात. मात्र, चहाचे प्रमाण आणि वेळांमध्ये अतिरेक केल्यास चहा नुकसानकारक असल्याचेही डॉक्टर सांगतात.

योग्य वेळ, योग्य प्रमाण असावे : योग्य वेळी, योग्य पद्धतीने बनवलेला चहा योग्य प्रमाणात घेतल्यास चहाचे फायदे आहेत. मात्र, अतिसेवन केल्यास तोटे आहेत. वारंवार उकळलेला, जास्त साखरेचा किंवा अधिक प्रमाणात चहा प्यायल्यामुळे पचनशक्ती बिघडून पित्ताचा त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

दिवसातून तीन चहा

५० ते ७५ एमएल हे चहाचे स्टँडर्ड माप आहे. त्यामुळे मेंदूला तरतरी आणण्यासाठी चहा चांगला असला तरी त्याचे अतिप्रमाणात आणि अधिकवेळा सेवन करणे अपायकारक ठरु शकते. सामान्यपणे दिवसांतून तीन वेळा चहा घेणे ठीक आहे. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, जीएमसी अकोला.

चहाचा बदलता ट्रेंड

अकोला शहरासह अगदी तालुक्याच्या ठिकाणीही हजारो कुटुंबांना चहाने रोजगार दिला आहे. कमी जागेत आणि कमी भांडवलात कमाईची संधी देणारा व्यवसाय म्हणून अनेक बेरोजगारांच्या आयुष्यात चहाने गोडी आणली आहे. अलिकडे चहाचे नवनवीन ब्रँडही शहरासह तालुक्याच्या ठिकाणीही येत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...