आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांमध्ये केवळ एक लाख रुपयांपर्यंत ठेवीची हमी : डीआयसीजीसीने केले स्पष्ट

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर एखादी बँक बंद पडली तर त्यात ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांनी भलेही जास्त रक्कम जमा केलेली असली तरी विमा सुरक्षेअंतर्गत केवळ एक लाख रुपयेच मिळतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिपाॅझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी काॅर्पाेरेशनने (डीआयजीसी) ही माहिती दिली आहे.


माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये रिझर्व्ह बँकेच्या डीआयसीजीसी या उपकंपनीने सांगितले की, ही मर्यादा बचत, मुदत, चालू आणि आवर्ती अशा सर्व प्रकारच्या ठेवींसाठी आहे. डिपाॅझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी काॅर्पाेरेशनने सांगितले की, डीआयसीजीसी कायद्याच्या कलम १६(१) अन्वये जर बँक अपयशी ठरली तर ती बंद करावी लागते. डीआयसीजीसी प्रत्येक ठेवीदाराला लिक्विडेटरच्या माध्यमातून विमा संरक्षण म्हणून एक लाख रुपये देण्यासाठी जबाबदार आहे. यामध्ये विविध शाखांमधील मूळ जमा रक्कम आणि व्याज दाेन्ही समाविष्ट आहे. पीएमसी बँकेचा घाेटाळा बघता एक लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आहे का, असे विचारले असता डीआयसीजीसीने सांगितले की, काॅर्पाेरेशनकडे अशी काेणतीही माहिती नाही. डीआयसीजीसी कायद्यांमध्ये सर्व पात्र सहकारी बँकाही येतात.

आरटीआयच्या उत्तरात काॅर्पाेरेशनने सांगितले की, बँकेमध्ये जाे काेणी पैसे जमा करताे, त्याला जास्तीत जास्त एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. याचा अर्थ जर काही कारणाने बँक अपयशी ठरली तर ती बंद केली जाते वा बँकेचा परवाना रद्द हाेताे. अशा स्थितीत त्यांना भलेेही बँकेत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केलेली असली तरीही एक लाख रुपये काेणत्याही परिस्थितीत मिळतील.

पीएमसी बँकेच्या घाेटाळ्यानंतर ग्राहकांना रकम जाेखमीची चिंता


बँकांमधील घाेटाळ्यांच्या विविध प्रकरणांनंतर  लोकांच्या बचत रकमेची जोखीम लक्षात घेता हे उत्तर महत्त्वाचे आहे.पीएमसी बँक प्रकरणातील कथित आर्थिक अनियमितता पाहता आरबीआयने तिच्या कामकाजावर काही निर्बंध घातले आणि प्रशासक नियुक्त केले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या मते, प्रशासनाने एचडीआयएल ग्रुपच्या कंपन्यांमधील कर्जाची चूक लपवली. बँकेने एकूण कर्जाच्या ७० टक्के एचडीआयएल समूहाला दिले.
 

बातम्या आणखी आहेत...