Post Office Scheme / आता पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये ऑनलाइन जमा होतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया


यासाठी 'पोस्ट पेमेंट बँकेत' उघडावे लागेल वेगळे खाते

दिव्य मराठी वेब टीम

May 16,2019 05:47:00 PM IST

नवी दिल्ली- भारतात आवर्ती ठेव योजना म्हणजे 'आरडी' (Recurring deposit) एक लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत व्यक्ती कमी रक्कम भरून मॅच्योरिटीवर मोठी रक्कम मिळवू शकतो. पण यासाठी चेकद्वारे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे जमा करावे लागायचे किंवा ऑफिस एजंटद्वारेही पैसे जमा करता येत होते. ही सर्व प्रक्रिया खूप कंटाळवाणी होती. म्हणून आता पोस्ट ऑफिसने आपल्याला या त्रासातून मुक्त करण्यासाठी एक सुविधा सुरू केली आहे. यामुळे आपण घरबसल्या ऑनलाइन 'आरडी' अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकता. या सुविधेसाठी आपल्याला एक नवीन खाते उघडावे लागेल.


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत उघडावे लागेल खाते
पोस्ट ऑफिस ही सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट्स म्हणजे आयपीपीबीद्वारे देत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी अकाउंटला आयपीपीबीच्या(IPPB) खात्यात लिंक करावे लागेल. त्यानंतर आयपीपीबी किंवा आयपीपीबी अॅपद्वारे ऑनलाइन आरडीचा मासिक हप्ता भरू शकता.


असे होतील पैसे जमा
प्रत्येक महिन्याचा आरडीचा हप्ता भरण्यासाठी सर्वात आधी आपल्या बँक खात्यातून 'आयपीपीबी' खात्यामध्ये पैसे जमा करावे लागतील. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर DOP उत्पादनावर जाऊन RD हा पर्याय निवडा. यामध्ये आरडी खात्याची संख्या आणि ग्राहक आयडीची माहिती भरा. यासोबतच आपल्याला हप्त्याची रक्कम आणि कालावधी निवडावा लागेल. तसेच, हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आपल्याला 'IPPB' मोबाइल अॅपवर याची माहिती मिळेल.

असे उघडा आयपीपीबी खाते
आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोरमध्ये जाऊन 'मोबाइल बँकिंग' हे अॅप्लीकेशन डाउनलोड करा आणि यामध्ये जाऊन डिजिटल बचत खात्यावर साइन अप करा. यानंतर आपली सर्व माहिती जसे की, पॅन कार्ड, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती आपल्याला यात भरावी लागेल. साइन-अप केल्यानंतर आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी (OTP) क्रमांक येईल, हा क्रमांक प्रविष्ट करताच एम पिन (M pin generates) जनरेट करावा लागेल यानंतरच मोबाइल बँकिंग प्रक्रिया पूर्ण होईल. यासोबतच आपल्याला 12 महिन्याच्या आत केवाईसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.


अॅपमुळे मिळतील हे फायदे
आयपीपीबी अॅपमुळे आपल्याला इतर अनेक फायदे मिळतील. याद्वारे आपण पीपीएफ रक्कम (PPF ammount) जमा करू शकता. तसेच, सुकन्या समृद्धी खाते (Sukanya samriddhi Account) आणि पोस्ट ऑफिसच्या इतर बचत योजनामध्ये (IPPB app) या अॅपद्वारे गुंतवणूक करू शकता.

X
COMMENT