आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहबाज, बिलावल यांच्यासह २८७० उमेदवारांची अनामत होणार जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल असेम्ब्लीचे अधिवेशन सुरू, ३२८ खासदारांना शपथ - Divya Marathi
नॅशनल असेम्ब्लीचे अधिवेशन सुरू, ३२८ खासदारांना शपथ

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये गेल्या २५ जुलैला झालेल्या निवडणुकीत पीएमएलएन-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांच्यासह २८७० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी २५ टक्के मते मिळवू न शकल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. 'डॉन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणुकीत २७२ जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे एकूण ३,३५५ उमेदवार मैदानात होते. त्यापैकी ८५ टक्के उमेदवारांची म्हणजे २,८७० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. त्यात १० राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश आहे. 


नॅशनल असेम्ब्लीचे अधिवेशन सुरू, ३२८ खासदारांना शपथ 
१५ व्या नॅशनल असेम्ब्लीचे पहिले अधिवेशन सोमवारी सुरू झाले. त्यात सर्वात आधी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांच्यासह ३२८ खासदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

बातम्या आणखी आहेत...