Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | depression medicine esketamine information

नैराश्यावरील नव्या औषधाने डॉक्टर हैराण

दिव्य मराठी | Update - Mar 13, 2019, 12:01 AM IST

नैराश्यावरील नव्या औषधाने डॉक्टर हैराण, एका महिन्याच्या डोसची किंमत 5 लाख रुपयांपर्यंत, वापराचेही नियम त्रासदायक 

  • depression medicine esketamine information

    अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)नुकतीच एका नैराश्यावरील नव्या औषधाला मंजुरी दिली आहे. आतापर्यंतच्या औषधांमध्ये ते सर्वाधिक प्रभावी मानले जात आहे. एस्केटामाइन नावाचे हे नेजल स्प्रे असून जॅनसेने फार्मास्युटिकल्सने त्याची निर्मिती केली आहे. अमेरिकेत स्प्रावॅटो नावाने त्याची विक्री होईल. या अँटीडिप्रेसेंटचे बहुतांश डॉक्टरांनी स्वागत केले आहे. मात्र आता काही डॉक्टर यातील व्यवहार्य अडचणींमुळे त्रासले आहेत. औषधाची किंमत आणि दीर्घकाळ होणाऱ्या परिणामांवर डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


    हे औषध घेताच मतिभ्रम (हॅल्युसिनेशन) सारखी समस्या उद्भवते. यामुळे एफडीएने या औषधांसाठी अनेक शर्थी ठेवल्या आहेत.


    चार आठवड्यांत दोन वेळा डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे औषध घेणे तसेच त्यानंतर दोन तास रुग्णालयात थांबणे आवश्यक आहे. ओरेगन हेल्थ अँड सायन्स विद्यापीठाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एरिक टर्नर म्हणतात, आठवड्यातून दोन वेळा रुग्णालयात जाणे आणि तेथे दोन तास थांबणे रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. रुग्णालयांत जागेचीही अडचण संभवू शकते.


    स्पाव्हॅटो या औषधाची किंमतही जास्त आहे. एका महिन्याला उपचारासाठी रुग्णाला ४७२० ते ६७८५ डॉलर म्हणजेच ३.३५ लाख ते ४.८१ लाख रुपये खर्च करावे लागतील. हे औषध रुग्णालयात घेण्याचा खर्चही वेगळा असेल. इतर औषधांच्या तुलनेत हा खर्च जास्त आहे. आतापर्यंत सामान्य अॅनेस्थेटिक औषधांद्वारे नैराश्यावर उपचार केला जातो. एस्केटामानच्या तुलनेत ते स्वस्त आहे. मात्र सामान्य अॅनस्थेटिक औषधांना नैराश्यावरील औषध म्हणून मंजुरी मिळालेली नाही.

Trending