आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे तर कोणी नाही, पण तिकडचा एखादा ज्योतिरादित्य संधिया होईल- अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानसभेत अजित पवारांची ऑपरेशन लोटसवर फटकेबाजी

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज विधानसभेत चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पवारांनी अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे पटवून दिले. यावेळी विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. अजित पवारांच्या भाषणादरम्यान मध्य प्रदेशातील ‘ऑपरेशन लोटस’चाही उल्लेख झाला. शिवसेनेला फसवणे ही चूक होती असा उपरोधिक टोला मुनगंटीवारांनी लगावला होता, त्यावरुन अजित पवारांनी टोलेबाजी सुरू केली.


मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, कमलनाथ सरकारला मोठा धक्का दिला. शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे मप्र सरकार डळमळीत झालंय. मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा हा दाखला देत, भाजप आणि विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातही तसेच होईल असा दावा करत आहेत. एक ना एक दिवस चूक होईल, कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रातही येईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ''इकडे तर कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, तिकडेच कुणीतर होईल लक्षात ठेवा. काही आज गैरहजर आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. मी काही लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं आणि इथंही आलो आणि मजबूत बसलो आहे,'' असा टोला त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...