आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास मुंबईत सहकुटुंब आपल्या साखरपुड्याची पार्टी देत आहेत. प्रियांकाने आपल्या वाढदिवशी (18 जुलै) रोजी आपला प्रियकर निक जोनासशी गुपचूप साखपुडा केला होता. परंतु, आज संध्याकाळी (शनिवार) ते पुन्हा रुढी परमपरेनुसार साखरपुडा करत आहेत. इंगेजमेंटमध्ये त्यांनी फक्त आप-आपले कुटुंबीय आणि जवळच्या मोजक्या मित्रांनाच निमंत्रण दिले आहे. देसी गर्ल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकाने ज्याच्यासोबत आपले आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला तो नेमका आहे तरी कोण? आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये कोण-कोण आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहे.
संगीतकारांच्या घरात जन्मला सिंगर, अॅक्टर आणि म्युझिशियन निक...
निक जोनासचे पूर्ण नाव निकोलस जेरी जोनास (Nicholas Jerry Jonas) असे आहे. निकचा जन्म 16 सप्टेंबर 1992 रोजी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डॅलास शहरात झाला. निक अमेरिकन सिंगर, साँग रायटर, अॅक्टर, आणि म्युझिक प्रोड्युसर आहे. निक जोनासचे वडील पॉल केव्हिन जोनास (Paul Kevin Jonas) गीतकार आणि संगीतकार आहेत. निकची आई डेनिस मिलर जोनास (Denise Miller-Jonas) सुद्धा सिंगर आणि साइन लँग्वेज टीचर होत्या. निकने आपल्या वयाच्या 7 व्या वर्षापासूनच काम सुरू केले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, निकची संपत्ती, भाऊ, गर्लफ्रेंड्स आणि बरेच काही...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.