Home | Business | Gadget | Despite the emoji, gif is trending

इमोजी असूनही चॅटमध्ये जिफ, अवतारचा ट्रेंड

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jul 21, 2019, 07:31 AM IST

जगभरात गेल्या बुधवारी वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यात आला

  • Despite the emoji, gif is trending

    गॅजेट डेस्क- जगभरात गेल्या बुधवारी वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यात आला. या हसऱ्या-रडक्या-स्मितहास्य करणाऱ्या इमोजींचा वापर युजर्स मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर करत असतात. स्टॅटिस्टा वेबसाइटनुसार जगात ३०१९ इमोजी आहेत. पण आता तेही कमी पडत आहेत आणि स्वत:ला व्यक्त करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधल्या जात आहेत. आता इमोजी आणि टेक्स्टसब व्हिडिओ, अवतार (स्वत:चे अॅनिमेटेड व्हर्जन), जिफ्सचा (जीआयएफ) वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. असे अनेक अॅप्स आले आहेत जे युजर्सना त्यात मदत करत आहेत.


    २०१८ मध्ये टॉप चार मेसेजिंग अॅप्सच्या दरमहा अॅक्टिव्ह युजर्सची संख्या ४.१ अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. आता युजर मेसेजिंग अॅपवर जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. एका अंदाजानुसार युजर्स दररोज सरासरी १२ मिनिटे मेसेजिंग अॅपवर घालवत आहेत आणि ७० टक्के सोशल शेअरिंग याच अॅप्सवर होत आहे. त्यामुळेच चॅटिंग किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सही आपले अॅप रंजक व्हावे यासाठी नवे प्रयोग करतात. व्हॉट्सअॅप, व्हीचॅट आणि फेसबुक मेसेंजर आता जिफ, व्हिडिओ आणि स्टिकर, सर्व काही जोडण्याचा पर्याय देत आहेत. दुसरीकडे, मोबाइल कीबोर्ड कंपन्याही मेसेजिंगमध्ये नवे पर्याय जोडतात.

Trending