आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Despite The Restrictions, The Practice Of The Women's Wheelchair Basketball Team Continues To Participate In The Paralympics

बंधने असूनही पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी महिला व्हीलचेअर बास्केटबॉल टीमची प्रॅक्टिस सुरू

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानमध्ये २६ वर्षांची दिव्यांग निलोफर बेअतचे परिश्रम अखेर फलद्रूप

काबूल- ३८ कोटी लोकसंख्येचा इस्लामिक देश अफगाणिस्तान. येथे १९९६-२००१ च्या शासनकाळात महिलांना शिक्षण, नोकरी एकट्याने बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. परंतु आता दिव्यांग निलोफर बेअत या बदलाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येत आहे. निलोफर व्हीलचेअर बॉस्केटबॉल संघाची कर्णधार असून ती सध्या संघासोबत कठोर सराव करत आहे.


टोकियोमध्ये २६ ऑगस्टपासून पॅरालॉम्पिक स्पर्धेत सहभाग घेत आहेत. बेअत म्हणाली, मी दोन वर्षांची असताना क्षेपणास्त्रात माझे घर उद््ध्वस्त झाले. या हल्ल्यात माझा भाऊ ठार झाला. माझा कणा मोडला. तरीही शिक्षण, नाेकरी मिळवण्यासाठी बॉस्केटबॉल खेळण्याची आवड कमी झाली नाही. ऑलिम्पकमध्ये भाग घेऊन जिंकण्याची ईर्षा आहे. 
 
८ वर्षांपूर्वी बास्केटबॉल खेळण्यास केली सुरुवातबेअत म्हणाली, मी ८ वर्षांपूर्वी इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेडक्रॉस (आयसीआरसी) द्वारे आयोजित टीमसोबत बास्केटबॉल खेळत होते. यानंतर व्हीलचेअर बास्केटबॉल टीम तयार केली. त्यानंतर आत्मविश्वास वाढला व आमच्या  संघाने आता इंडोनेशिया व थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ पदके मिळवली आहेत. अफगाणिस्तानात अपंगांची संख्या १५ लाख इतकी आहे. 

बातम्या आणखी आहेत...