आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यस्त शब्द नष्ट करा, तो तुमचं भावनिक स्वास्थ्य संपवेल

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

आजकाल आपण तणाव निर्माण झाल्यावर काही गोष्टींची काळजी घेऊ लागतो. पहिल्यापासून दक्षता घेतली, तर कोणालाही तणाव येणार नाही. वारंवार परदेश वाऱ्या करणाऱ्यांना तिथं गेल्यावर जाणवतं की तिकडे बहुतांश लोक एकटे राहतात. रस्त्यांवरही एकटे लोकच दिसतात. तिथं एकटेपणाला औदासिन्य आणि अस्वस्थता कारणीभूत असते. पण, आपल्याकडे काय कारण आहे? इथं तर पाच मिनिटही एकटं राहायला मिळत नाही. हे आपलं भाग्य आहे की आम्ही भारतात राहतो, जिथं आपण कधीही एकटे नसतो. आमच्यासोबत सदैव एक दिव्य शक्ती असते. तरीही अशा वातावरणात सगळ्यांमध्ये असूनही कधी कधी आपण एकटे पडतो. आपले भावनिक स्वास्थ्य १० टक्क्यांवर आणण्याचे वचन आज आपण स्वत:ला देऊ. डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी चारपैकी एक व्यक्ती निराशेने ग्रस्त असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या संघटनेने सांगितले, की २०२० पर्यंत मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण डिप्रेशन अर्थात औदासिन्य हेच असेल. पण, आपले आणि आपल्या भोवतालच्या सर्वांचे भावनिक स्वास्थ्य १० पर्यंत नेण्याचा निर्धार आज आपण केला, तर २०२० च्या अखेरीस किमान भारतातून डिप्रेशन हद्दपार होईल आणि ही आपली जबाबदारी असली पाहिजे. आता त्याची काळजी वाहायची नाही, तर ते पूर्णपणे संपवायचे आहे. आपल्याला अथवा अन्य कुणाला तणाव, निराशा आणि चिंता ग्रासणार नाही, ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. दुसऱ्यांची काळजी घेण्याआधी स्वत:ची घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली आपण कुणाला थोडासा वेळ काढून सकाळी ध्यानधारणा करायला सांगितले, की त्याच्या उत्तरादाखल एक नकारात्मक ऊर्जा असलेले शब्द सर्वांच्या तोंडी असतात ते म्हणजे, ‘मी खूप बिझी आहे’ आणि दुसरा ‘माझ्याकडे वेळ नाही’. हे शब्द आजच्या घडीला सर्व दु:खाचे मूळ ठरले आहेत. आपण दिवसभरात कितीतरी वेळा ते उच्चारतो. आपल्याला वेळ नाही, हे वारंवार आपण स्वत:ला बजावतो. या वर्षी आपण ही धारणा बदलू आणि ‘व्यस्त’ शब्द कायमचा नष्ट करु. हा शब्द आपल्या भावनिक आरोग्याची हानी करतो आहे. सर्वांकडे तेवढाच वेळ आहे, पण त्याच्या बाबतीत प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा आहे. काही लोक अठरा तास काम करुनही एकदम मोकळे, मजेत असतात आणि काही जण काहीही न करता म्हणतात की मला वेळच नाही. हे घरात असतात, निवृत्त झालेले असतात, काही करीत नसतात, पण असे वाटते की त्यांच्यापेक्षा कुणीही व्यस्त नाही. अडचण मनाच्या आत आहे, बाहेर नाही. आता आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द वापरावे लागतील.

बी.के. शिवानी, ब्रह्माकुमारीज

बातम्या आणखी आहेत...