आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला होता. या घटनेत 166 जणांचा मृत्यू झाला होता. अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. त्याला 2012 च्या नोव्हेंबरमध्येच फाशी देण्यात आली. कसाबला फाशी दिल्यानंतर या हल्ल्याचा एक अध्याय संपला. परंतु, हल्ल्याने ज्यांना कधीही भरुन न निघणा-या जखमा दिल्या, त्यांना न्याय मिळाला का? याचे उत्तर नाही असेच आहे. या हल्ल्याचा कट रचणारे आजही मोकाट आहेत. त्यावर कळस म्हणजे पाकिस्तानने नुकतेच हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला नजरकैदेतून मोकाट सोडले आहे. कसाब तर केवळ एक प्यादा होता. परंतु, त्याला नाचविणा-यांना शिक्षा झाली पाहिजे.
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना भारतविरोधी कारवाया करत राहतात. इंडियन मुजाहिदीनसारख्या संघटनेला पाकिस्तानची आयएसआय पाठबळ देते. गेल्या वर्षी पाटण्यात बॉम्बस्फोट झाले. त्यापूर्वी बुद्धगया येथील महाबोधी मंदिराला लक्ष्य करण्यात आले. कसाबला फाशी दिल्यानंतरही दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. हे सर्व मोडून काढले पाहिजे. तरच ख-या अर्थाने न्याय मिळेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कसा झाला मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ला....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.