Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Detained wife of a prominent businessman who hangs ornaments

भाविकांचे दागिने लंपास करणारी प्रतिष्ठित व्यापाऱ्याची पत्नी ताब्यात

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 10:36 AM IST

जालन्यामध्ये महिलेकडून दागिने, रोख केली हस्तगत

  • Detained wife of a prominent businessman who hangs ornaments

    जालना - तीन महिन्यांपूर्वी जालना शहरातील गुरु गणेश भवनमध्ये महिला दर्शन घेत असताना बाजूला ठेवलेली पर्स चोरी गेल्याची घटना घडली होती. यात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा तपास लावून पर्स चोरून नेणाऱ्या एका महिलेस ताब्यात घेतले. सदरील चोर महिला ही जालना शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची पत्नी असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    कर्नाटकातील मल्लेश्वरम (बंगळुरू) येथील मंजुदेवी सिंघवी मागील जानेवारी महिन्यात जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान जालना येथील गुरुगणेशलालजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी समाधीचे दर्शन घेत असताना त्यांची पर्स चोरी गेली होती. या पर्समध्ये ७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये होते. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी गुरु गणेश भवनमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासचक्रे फिरवली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला मंजुदेवी यांनी दर्शन करताना बाजूला ठेवलेली पर्स उचलून घेऊन घाईगडबडीने एका कारमधून निघून जात असल्याचे निष्पन्न झाले होते. या कारचा क्रमांक (एमएच-२१, एएक्स- १२२२) पोलिसांनी शोध घेऊन आज त्या चोर महिलेला अटक केली. महिलेच्या ताब्यातून चोरलेले ७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेतली.

Trending