आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Personal Life : देव साहेबांचे वडील होते प्रसिद्ध वकील, अभिनयापूर्वी करायचे क्लर्कचे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः एव्हरग्रीन हीरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते देव आनंद यांची आज 95 वी बर्थ अॅनिव्हर्सरी असून त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये झाला होता. देव आनंद यांनी वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजे 1946 मध्ये चित्रपटात एन्ट्री घेतली होती. पण त्याच्या पाच ते सहा वर्षांपूर्वी ते सेन्सॉरचे काम करत होते. आज  जाणून घेऊयात देव साहेबांच्या खासगी आयुष्याविषयी...

 

40च्या दशकात मुंबईत आले होते देव साहेब... 
देव आनंद यांचे वडील पिशौरी लाल आनंद गुरदासपूरचे प्रसिद्ध वकील होते. त्यांचे शालेय शिक्षण डलहौजीमध्ये झाले तर त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी लाहोरमधून पूर्ण केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर देव आनंद यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आणि 40 च्या दशकात ते मुंबईत आले. मुंबईत उदरनिर्वाह करण्यासाठी देव आनंद यांनी नोकरी शोधली आणि त्यांना सेन्सॉर ऑफिसमध्ये नोकरी मिळाली.

 

चित्रपट नव्हे, लष्कराचे होते सेन्सॉर ऑफिस...
देव आनंद यांना चित्रपटाच्या नव्हे तर लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये नोकरी मिळाली होती. याठिकाणी देव आनंद क्लर्क म्हणून रुजू झाले होते. याठिकाणी त्यांना सैनिकांची पत्रे वाचण्याची कामे करावी लागायची. जर पत्रामध्ये काही विनाकारणची माहिती असेल तर त्या पत्राचे सेन्सॉर करण्याचे त्यांचे काम होते.

 

अकाऊंटींगचे कामही केले..
मिलिट्री सेन्सॉर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर देव आनंद यांनी काही काळ अकाऊंटींग फर्ममध्येही नोकरी केली होती. याठिकाणीही देवसाहेब क्लर्क म्हणूनच काम करत होते. 

 

अशोक कुमारांमुळे निर्माण झाली होती अभिनयाची आवड...
देव आनंद यांच्या मनात अॅक्टर होण्याची इच्छा निर्माण झाली ती अशोक कुमार यांच्यामुळे. देव आनंद यांनी अशोक कुमार यांचे 'अछूत कन्या' आणि 'किस्मत' चित्रपट पाहिल्यानंतरच अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता. 


थेट शिरले होते प्रभातच्या ऑफिसमध्ये... 
अभिनय करण्याचे करण्याचे मनाशी पक्के केल्यानंतर देवसाहेब थेट प्रभात फिल्म्सच्या ऑफिसमध्ये शिरले होते. स्टुडिओतील लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात त्यांना यशही आले. स्टूडियोत उपस्थित असणाऱ्यांना त्यांचे हास्य, डोळे आणि आत्मविश्वास आवडला. अशाप्रकारे त्यांना 1946 मध्ये पहिला चित्रपट 'हम एक है' मिळाला आणि सिनेसृष्टीला मिळाला एव्हरग्रीन रोमँटिक हीरो.

 

बातम्या आणखी आहेत...