आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झीनत अमानला प्रपोज करण्यासाठी देवानंद यांनी अरेंज केली होती पार्टी, येथे मिळाला सर्वात मोठा धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानल्या जाणा-या देव आनंद यांची आज 95 वी बर्थ अॅनवर्सरी आहे. देव आनंद यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीला वेगळ्या उंचीवर नेले. देवानंद यांनी बॉलिवूडला टीना मुनीम आणि झीनत अमानसारख्या सेक्स सायरन म्हटल्या जाणा-या उत्कृष्ठ अभिनेत्री दिल्या. चित्रपटांसोबतच देव आनंद हे आपल्या वयक्तित आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले.

 

झीनत अमानवर जडला होता देव आनंद यांचा जीव 
- अनेक अभिनेत्रींचा जीव देव आनंदवर जडला, परंतु त्यांची प्रेमकथा कधी पुर्ण होऊ शकली नाही. आज आम्ही तुम्हाला देव आनंद यांची अशीच एक प्रेमकथा सांगणार आहेत. ही प्रेमकथा पुर्ण होऊ शकली नाही. ही लव्ह स्टोरी देव आनंद आणि झीनत अमान यांची होती.
- देव आनंद यांनी 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटात झीनत अमानला कास्ट केले होते. या चित्रपटात झीनत यांनी देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. शूटिंग दरम्यान देव आनंद यांना जाणवले की, ते झीनतवर प्रेम करतात. देव आनंद यांना झीनतची प्रत्येक गोष्ट आवडत होती.
- ते झीनतच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. झीनतपुर्वी हे वृत्त मीडियाला कळाले. मीडियामध्ये दोघांच्या लिंकअपच्या बातम्या वाचून देव आनंद आनंदी व्हायचे. याचा उल्लेख स्वतः देव आनंद यांनी आपल्या 'रोमांसिंग विद लाइफ' या ऑटोबायोग्राफीमध्ये केला होता. 
- देव आनंद यांनी झीनतला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. देव साहेबांनी विचार केला की, ते झीनतला ताज हॉटेलमध्ये प्रपोज करतील. याच हॉटेलमध्ये देव आणि झीनत डिनरसाठी जात असत. झीनतला प्रपोज करण्यासाठी देव साहेबांनी छोटीशी पार्टी अरेंज केली.
- या पार्टीमध्ये देव आनंद यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना बोलावले. परंतु पार्टी दरम्यान असे काही पाहिले, ज्यामुळे त्यांची आयुष्य उध्वस्त झाले. या पार्टीमध्ये राज कपूर यांनी नशेत झीनत अमानला मिठी मारली. झीनतनेही राज कपूरला मिठीत घेतले. 
- हे सर्व पाहून देव आनंद यांचे मन खुप मोडले. अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. यापुर्वीही राज कपूर आणि झीनत अमान यांच्या रोमान्सच्या बातम्या आलेल्या होत्या. याच कारणांमुळे राज कपूरने झीनतला आपल्या 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये प्रमुख भूमिका दिली होती.
- देव आनंद यांनी राज कपूर आणि झीनत यांच्या बातम्या अफवा समजून दुर्लक्षित केल्या होत्या. या सर्व घटनेविषयी देव साहेंबानी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, हे सर्व पाहिल्यानंतर मी पार्टीमधून बाहेर गेलो. नंतर कधीच झीनतविषयी विचार केला नाही. अशा प्रकारे देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा द एंड झाला. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...