आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

/ शुक्रवारी देवप्रभोधिनी एकादशी, तुळशीजवळ दिवा लावावा आणि सौभाग्य सामग्री अर्पण करावी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 8 नोव्हेंबर 2019 ला तुळशी विवाह, देवउठनी म्हणजे देव प्रबोधिनी एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. तुळशीचे लग्न शाळीग्राम (श्रीविष्णूंचे स्वरूप)सोबत केले जाते. मान्यतेनुसार प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णू झोपेतून जागे होतात. ही देव उठण्याची तिथी असल्यामुळे याला देवउठनी एकादशी म्हणतात.

1. शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि वस्त्र अर्पण करावेत. यासोबतच सौभाग्य सामग्रीही अर्पण करावी. दुसऱ्या दिवशी (9 नोव्हेंबर) एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्य सामग्री दान करावी.

2. सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत, कारण शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीचे पाने तोडणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. अमावस्या, चतुर्दशी तिथीला तुळशीची पाने तोडू नयेत. रविवार, शुक्रवार आणि सप्तमी तिथीलाही तुळशीची पाने तोडू नयेत.

3. विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत. वर्ज्य सांगण्यात आलेल्या दिवसांमध्ये तुळशीच्या पानांचे काम असल्यास गळून पडलेली पाने घेऊ शकता. वर्जित करण्यात आलेल्या तिथीच्या एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवू शकता.

4. शुक्रवारी सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा. पाण्यामध्ये लाल फुल आणि अक्षताही टाकाव्यात. या दरम्यान सूर्य मंत्र ऊँ सूर्याय नम:, ऊँ भास्कराय नम: जप करावा.

5. शुक्रवारी संध्याकाळी भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजेमध्ये सामान्य पूजन सामग्री व्यतिरिक्त दक्षिणावर्ती शंख, कमळगट्टा, गोमती चक्र, पिवळ्या कवड्याही ठेवाव्यात. 

6. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...