आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवप्रबोधिनी एकादशीला शाळीग्राम आणि तुलसी विवाहाने प्रसन्न होतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवप्रबोधिनी (देवउठनी) एकादशी 8 नोव्हेंबरला आहे. या दिवशी भगवान शाळीग्राम आणि तुळस यांचा विवाह करण्याची करण्याची प्रथा आहे. शाळीग्राम शिळेला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणातील एका कथेनुसार तुळशीने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला होता. यामुळे भगवान विष्णू यांना शाळीग्राम व्हावे लागले आणि या रूपात त्यांनी तुलसीसोबत लग्न केले.

1. ज्याठिकाणी भगवान शाळीग्रामची पूजा होते, तेथे श्रीविष्णू आणि महालक्ष्मी एकत्र निवास करतात.

2. हे स्वयंभू मानले जाते म्हणजेच यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. कोणताही व्यक्ती देवघरात शाळीग्राम स्थापित करू शकतो.

3. शाळीग्राम वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असते. या दगडावर (शिळा) शंख, गदा, पद्म यासारखे चिन्ह असतात.

4. शाळीग्राम पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जात नाही. तुळस अर्पण केली तरच शाळीग्राम प्रसन्न होतात.

5. शाळीग्राम आणि भगवती स्वरूप तुळशीचे लग्न लावल्यास सर्व कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात.

6. तुळस-शाळीग्राम विवाह केल्याने कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होते.

7. पूजा करताना शाळीग्रामला चंदन लावावे आणि तुळस अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो.

8. विष्णू पुराणानुसार, ज्या घरामध्ये शाळीग्राम असते ते घर तीर्थसमान मानले जाते. 

9. शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमधून मिळतात. शाळीग्राम काळ्या रंगाचे अंडाकार दगडाप्रमाणे असतात. 

10. पूजेमध्ये शाळीग्रामला केलेल्या अभिषेकाचे पाणी स्वतःवर शिंपडल्यास तीर्थ स्नानाचे पुण्य मिळते.

11. शाळीग्रामवर नियमितपणे जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. 

12. शाळीग्रामला अर्पण केलेले पंचामृत प्रसाद स्वरूपात सेवन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. 

13. ज्या घरामध्ये शाळीग्रामची रोज पूजा केली जाते, तेथील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...