आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान विष्णूंचे स्वरूप आहे शाळीग्राम, जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव प्रबोधिनी एकादशीला तुळशीचे शाळीग्रामसोबत लग्न लावण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार ही तिथी यावेळी सोमवार 19 नोव्हेंबरला आहे. शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमध्ये आढळून येतात. हे काळ्या आणि गुळगुळीत, अंडाकार दगडाप्रमाणे दिसतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शाळीग्राम घरात ठेवण्याची इच्छा असल्यास यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. या दगडांना भगवान विष्णूंचे स्वरूप मानण्यात आले आहे.


1. ज्याठिकाणी भगवान शाळीग्रामची पूजा होते, तेथे श्रीविष्णू आणि महालक्ष्मी एकत्र निवास करतात.


2. हे स्वयंभू मानले जाते म्हणजेच यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. कोणताही व्यक्ती देवघरात शाळीग्राम स्थापित करू शकतो.


3. शाळीग्राम वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असते. या दगडावर (शिळा) शंख, गदा, पद्म यासारखे चिन्ह असतात.


4. शाळीग्राम पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जात नाही. तुळस अर्पण केली तरच शाळीग्राम प्रसन्न होतात.


5. शाळीग्राम आणि भगवती स्वरूप तुळशीचे लग्न लावल्यास सर्व कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात.


6. तुळस-शाळीग्राम विवाह केल्याने कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होते.


7. पूजा करताना शाळीग्रामला चंदन लावावे आणि तुळस अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान शाळीग्राम पूजेचे इतर काही खास लाभ...

बातम्या आणखी आहेत...