Home | Magazine | Rasik | Devadatt Patnayak writes about Jagannath Rath Yatra

जगन्नाथ रथयात्रा

देवदत्त पटनायक, | Update - Jul 07, 2019, 12:10 PM IST

हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचे रहस्य नेमके काय आहे?

  • Devadatt Patnayak writes about  Jagannath Rath Yatra
    १०० वर्षांपूर्वी जगन्नाथ मंदिर असे दिसत होते.

    वर्षा ऋतूचे आगमन होण्यापूर्वी ओडिशाच्या पुरी शहरात जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला सुरुवात होते. तीन भल्या मोठ्या रथांमधून मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रेसोबत श्रीकृष्ण जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडतात आणि काही अंतरावर असलेल्या गुंडीचा या छोट्या मंदिरापर्यंत ही यात्रा निघते. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचे रहस्य नेमके काय आहे?


    असे म्हणतात की, मधुवन सोडून ज्या वेळी श्रीकृष्ण मथुरेला गेले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त अक्रूर नावाचा एक सारथीच सोबत होता. त्यानंतर ते कधीच गोकुळात परतले नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की तेव्हापासून भागवत पर्व समाप्त झाले आणि महाभारत पर्व सुरू झाले. परंतु कृष्णाची माता यशोदा, राधा आणि असंख्य गोपिकांची कायम हीच इच्छा होती की कृष्णाने गोकुळात परतावे. या रथयात्रेची नेमकी संकल्पनाच हीच आहे की कृष्ण गोकुळात परतलाय. परंतु या वेळी तो एकटाच नसून त्याच्यासोबत फक्त बलभद्रच नसून बहीण सुभद्रालाही सोबत घेऊन आलाय. सुभद्रा ही यशोदेची कन्या, जिला कंसाने मारण्याचा प्रयत्न केला होता. सुभद्रेचा जन्म होताच कृष्णासोबत अदलाबदली करण्यात आली होती. अशारितीने ही भावंड पुन्हा एकदा वृंदावनमध्ये दाखल झाले आहेत. या रथयात्रेच्या मागे अशा भावना आहेत. जगन्नाथ पुरीशी नेहमी कृष्णाशी संबंध लावला जातो. परंतु ओडिसाच्या अनेकांचा असा दावा आहे की जगन्नाथ हे स्वयं नारायण आहेत. ते अवतार आणि अवतारी दोन्ही आहेत. ते विष्णुच्या रूपात आहेत. आणि बलभद्र शंकराच्या. म्हणूनच जगन्नाथ काळ्या रंगाचे असून बलभद्र गोरे आहेत आणि या दोहोंमध्ये सुभद्रा ही शक्तीच्या रूपात उभी आहे. शाक्त परंपरेनुसार जगन्नाथ मंदिर वास्तविक एक शक्तिपीठ असून शक्तीच्या आजूबाजूला काळा भैरव आणि गोरा भैरव बसले आहेत. वैष्णव परंपरेनुसार अगोदर श्रीकृष्णाला मधोमध बसवले जात होते, परंतु जोरदार वादळवाऱ्यामुळे सुभद्रा घाबरली आणि तिचे संरक्षण करण्यासाठी दोघे भाऊ मग तिच्या आजूबाजूला उभे राहिले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार श्री जगन्नाथ ना पुरुष आहेत ना स्त्री... म्हणून रामाच्या जन्मापूर्वी त्यांनी कौशल्येचे रूप घेतले आणि रामाचा जन्म होताना कोणत्याही पिडा होऊ नयेत यासाठी त्यांनी कौशल्येला तशी औषधे दिली होती. अगदी तसेच त्यांनी कृष्णाच्या जन्मापूर्वी देवकीचे रूप घेतले होते. म्हणूनच जगन्नाथाला देवतांचे रूप तसेच पुरुषोत्तम असेही म्हणतात. असे म्हणतात की, ओडिशाच्या या जगन्नाथ मंदिरावर अनेक हल्ले झाले होते. अनेक राजांनी मंदिरात घुसून मूर्ती जाळण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, इतके होऊनही या रथयात्रेची परंपरा अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली बनली. बाराव्या शतकात या मंदिराची स्थापना झाली. या मंदिराशी संबंधित एक खास सिद्धांत आहे ते म्हणजे विश्वाची नश्वरता. म्हणूनच या यात्रेसाठी दरवेळी नवीन रथ तयार केले जातात आणि यात्रा संपली की रथ मोडून टाकले जातात. रथाप्रमाणेच देवांची मूर्तीही नवीन बनवली जाते, १२ वर्षांनी त्यांचा मृत्यू होतो आणि मग पुनर्जन्मही... पुनर्जन्म हा हिंदू परंपरेचा आधारस्तंभ आहे आणि हाच या जगन्नाथ मंदिराचा रिवाजही...

Trending