आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्र आणि तारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीष्म, शिशिर, वसंत, शरद अशा अनेक, कोणत्याही ऋतूंमध्ये पवित्र रमजानचे आगमन होत असतं आणि याचे कारण म्हणजे इस्लाम धर्म चांद्रवर्ष मानतो. चांद्रवर्षामुळे रमजान हा महिना वेगवेगळ्या ऋतूंत येऊ शकतो. 

 

ग्रीष्म, शिशिर, वसंत, शरद अशा अनेक, कोणत्याही ऋतूंमध्ये पवित्र रमजानचे आगमन होत असतं आणि याचे कारण म्हणजे इस्लाम धर्म चांद्रवर्ष मानतो. चांद्रवर्षामुळे रमजान हा महिना वेगवेगळ्या ऋतूंत येऊ शकतो. या चंद्रावर आधारित कॅलेंडरनुसार वर्षाचे जवळपास ३५४ दिवस असतात आणि त्याउलट सूर्यावर आधारित कॅलेंडरमध्ये वर्षाचे ३६५ दिवस... म्हणूनच इस्लामी कालगणनेची सुरुवात अन् शेवटही वेगवेगळ्या दिवशी होतो. रमजान हा नवव्या महिन्यात असतो आणि वर्षाची सुरुवात ही सतत बदलत असल्याने रमजानचा महिनाही बदलत जातो.

 
वास्तविक अरब हे गणिती शास्त्रात अतिशय निपुण म्हणून ओळखले जातात. बीजगणित / अलजेब्रा या शब्दाची व्युत्पत्तीच अरबी भाषेतून झाली आहे. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो की, जर अरब गणितामध्ये इतके हुशार होते तर त्यांच्याकडून अशी चूक कशी काय झाली? यासंदर्भात वेगवेगळी मतं असली तरी एक प्रवाह असा आहे जो मानतो की कदाचित त्यांना रमजान महिना नेमका कधी येतो याचे ज्ञान नव्हते.  असे म्हणतात की, रमजान महिन्यातच अल्लाने जिब्रील या देवदूतामार्फत महंमद पैगंबर यांना आदेश दिले, परंतु त्या वेळी नेमका कोणता महिना सुरू होता हे ठाऊक नव्हते. म्हणूनच रमजान हा पवित्र सण दर वेळी वेगवेगळ्या ऋतूत येतो आणि इस्लामी कालगणनेनुसार मुद्दामच त्याचे स्वरूप असेच ठेवले आहे, त्यात कोणतीही चूक झालेली नाही.


असेही म्हटले जाते की, इस्लाम धर्माच्याही अगोदर मक्का-मदिनामध्ये अनेक देवी-देवतांची पूजा केली जायची. मात्र, महंमद पैगंबर यांनी ही प्रथा बंद केली. या देवी-देवतांमध्ये चंद्र आणि शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व होते आणि म्हणूनच आज ईद कधी सुरू होणार हे ठरवण्यात चंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चंद्रदर्शन झाल्यानंतरच ईद साजरी केली जाते. शुक्र ग्रहाचे दर्शन झाले की मक्केमध्ये पहिला नमाज पढला जातो, असेही मानले जाते. त्यामुळे चंद्र आणि शुक्र यांचा इस्लामशी संबंध असल्याचा विश्वास मुस्लिमांमध्ये आहे. इस्लामचे प्रतीक पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की त्यात चंद्र आणि ताऱ्यांचा समावेश आहे. 


परंतु ऐतिहासिक कालखंड पाहिला तर ही प्रतीके केेवळ इस्लामचीच प्रतीके नाहीत. इस्लामचा जन्म १४०० वर्षांपूर्वीचा आहे तर या प्रतीकांचा वापर अगदी उशिरा म्हणजे ४००-५०० वर्षांपासून सुरू झालेला आहे. सुरुवातीला तुर्कीच्या उस्मान राजवंशीय (Ottoman)सुलतानांनी चंद्र आणि ताऱ्यांची ही प्रतिके स्वीकारली आणि त्यानंतर इस्लामने. त्यापूर्वी अशा प्रतीकांचा उपयोग ख्रिश्चन धर्मातदेखील असल्याचे उल्लेख आहेत. इस्तंबुलचे ख्रिस्ती राजे कॉन्स्टंटीन (Constantine) याचा वापर करत असत. आजही अनेक देशांत ख्रिस्ती समूह अशा चंद्र-ताऱ्यांच्या चिन्हाचा वापर करतात. इस्लाममध्ये त्याला पंचकुंड तारा, तर ख्रिस्ती समूहात त्याला अष्टकुंड तारा म्हणतात, जे येशूचे चिन्ह समजले जाते आणि चंद्राला मरियमशी  (मदर मेरी) जोडले गेले आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या चंद्राचा आकारमान कमी होत जात असल्याने तो जॉन द बाप्टिस्टचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच बाप्टिस्टने म्हटले होते की,  जसजसा माझा प्रकाश कमी होत जाईल तसतसा येशू ख्रिस्ताचा प्रकाश अधिक उजळेल. म्हणूनच पूर्ण तारा हे येशूचे, तर घटत जाणारा चंद्र हा जॉन द बाप्टिस्टचे प्रतीक आहे.


ख्रिस्ती धर्माच्याही अगोदर ह चिन्हे आपल्याला प्राचीन युनानमध्ये सापडतात जेथे आर्टेमिस आणि अपोलो या बहीणभावांनी ही चिन्हे स्वीकारलेली आहेत. चंद्र हा आर्टेनिस नावाच्या देवीचे चिन्ह आहे, तर अपोलो हा सूर्य आहे. 
इस्लाममध्ये प्रतीकांचा वापर होत नाही, त्यावर प्रतिबंध आहे. प्रतीकांचा इतिहास हा नेहमीच क्लिष्ट राहिलेला आहे आणि अशा प्रतीकांचा वापर मनुष्याने कशासाठी सुरू केला याबद्दल आपल्याला खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. सध्या तरी आपण असेच गृहीत धरतो, आपली ओळख करून देण्यासाठी किंवा आपल्या झेंड्यावर वापरण्यासाठी...
 

देवदत्त पटनायक
divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...