आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापुर्वीच बंद पडले बाळाच्या हृदयाचे ठोके, आईने डिलीवरीनंतर शेअर केला भावुक फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्टोरिया. ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरियामध्ये राहणा-या एका आईने आपल्या मृत नवजात बाळाचा फोटो शेअर करुन महिलांना सावध करण्यास सुरुवात केली आहे. येथे राहणा-या 20 वर्षांच्या क्रिस्टी वॉटसनने एक भावुक करणा-या पोस्टमधून, तिच्या बाळाच्या हृदयाचे ठोके गर्भातच कसे बंद पडले होते याविषयी सांगितले. प्रेग्नेंसीदरम्यान तिच्या शरीरात याचे लक्षण पहिलेच दिसत होते. पण तिने हे लक्षण सामान्य समजून यावर दुर्लक्ष केले.


यामुळे झाला बाळाचा मृत्यू 
- क्रिस्टीने लिहिले की, मला जे दुःख झाले ते कोणत्याही कुटूंबातील आईला होऊ नये. क्रिस्टीने सांगितले की, तिच्या बाळाचा मृत्यू प्री एक्लेम्पसिया pre-eclamspia मुळे झाला होता. या आजारामुळे हाय ब्लड प्रेशरसोबतच यूरिनमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढते.
- नर्सने सांगितले की, तिच्या बाळाचे हार्ट बीट नव्हते. याच्या तीन दिवसांनंतर क्रिस्टीच्या मृत बाळाची डिलीवरी करण्यात आली.
- जवळपास 12 तास सुरु असलेल्या या अवघड प्रोसेसनंतर क्रिस्टीने आपल्या मृत बाळाला कुशीत घेतले आणि ढसाढसा रडली.


बाळाला तयार केले 
-रिपोर्ट्सनुसार क्रिस्टीने मृत बाळाला आपल्या हातांनी अंघोळ घातली. नवीन कपडे घालून तयार केले आणि टेडी बियर्समध्ये झोपवले. हे पाहून हॉस्पिटलमधील स्टाफ भावुक झाला. क्रिस्टी वारंवार सांगत होती की, आपण आपल्या शरीरातील कोणत्याही गोष्टीवर दुर्लक्ष करु नये.


काही तरी चुकीचे होत असल्याचे मला पहिलेच वाटत होते 
- क्रिस्टी म्हणाली, "माझ्या चेह-यावर आणि पायांवर वारंवार सूज येत होती. अनेक आठवडे भयंकर डोकेदुखी होत होती. माझे ब्लड प्रेशर वाढत होते. मला वाटत होते की, हे प्रेग्नेंसीचे लक्षण नसू शकतात. पण तरीही मी या गोष्टींना सिरीयस घेतले नाही. जर प्रेग्नेंसीमध्ये तुम्हाला असे काही जाणवले तर डॉक्टरांना उशीर न करता भेटायला हवे."

 

 

 

बातम्या आणखी आहेत...