आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devaswom Board Step Back On Sabarimala Issue And Agrees To All Age Women Entry In Temple

सबरीमाला : 10 ते 50 वयोगटातील महिला प्रवेशाच्या मुद्द्यावर मंदिर बोर्डाची माघार, म्हटले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करणार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सबरीमाला मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवासम बोर्डाने त्यांच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. त्यांनी महटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्य आदेशाचा सन्मान करत सर्व वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेशाची परवानगी दिली जाणार आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात 54 पुनर्विचार याचिकांसह 64 अर्ज सादर करण्यात आले होते. बुधवारी यावर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील घटनापीठाने सुनावणी केली. 


याचिकाकर्ते म्हणाले-परंपरेचा संबंध वर्णभेदशी नको 
याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या नायर सर्व्हीस सोसायटी (एनएसएस) चे वकील के. परासरन यांनी कोर्टाशी बोलताना म्हटले की, सबरीमला येथील परंपरेचा वर्णभेदाशी संबंध नाही. ही केवळ एक धार्मिक प्रता आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयावर पुनर्विचार करावा अशी याचिकार्त्यांची मागणी आहे. 


केरळ सरकारने निर्णयावर पुनर्विचार करण्यास विरोध केला. त्यांचे जयदीप गुप्ता कोर्टाला म्हणाले की, तुमच्या समोर असे तथ्यच माडले नाहीत जे पुनर्विचाराला न्यायासंगत सिद्ध करतील. 

बातम्या आणखी आहेत...