आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरस्वतीचा हंस की लक्ष्मीचे कमळ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदत्त पटनायक  

शिक्षण घेतल्यावर प्रत्येकाचे ज्ञान आणि विचार व्यापक होतील असं पूर्वी मानलं जायचं. पण आता असं होत नाही. आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फक्त भविष्यात पैसे कमावण्याची गुंतवणूक आहे. तत्त्वज्ञान आणि साहित्य आता कोण शिकतं? कारण ते शिकल्याने पुरेशी कमाईच होत नाही.
आपल्या देशातील अनेक नेत्यांना वाटते की शाळेमध्ये दिवसाची सुरुवात ही सरस्वती वंदनेने झाली पाहिजे. तर मग लक्ष्मीच्या आरतीने का नाही? शेवटी पालक आपल्या मुलांना शाळेत यासाठीच तर पाठवतात की ते स्वत:साठी पैसा आणि सत्ता दोन्ही मिळवू शकतील...  तुम्हाला असं वाटत नाही का की विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये,  मॅनेजमेंट संस्था, कला अकादमी आणि इतर महाविद्यालयांमध्ये सरस्वतीची पूजा ही लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या हेतूनेच केली जात नाही का?

शिक्षण घेतल्यावर प्रत्येकाचे ज्ञान आणि विचार व्यापक होतील असं पूर्वी मानलं जायचं. पण आता असं होत नाही. आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फक्त भविष्यात पैसे कमावण्याची गुंतवणूक आहे. तत्त्वज्ञान आणि साहित्य आता कोण शिकतं? कारण ते शिकल्याने पुरेशी कमाईच होत नाही. कलेच्या वस्तू आता फक्त याचसाठी तयार केल्या जातात की कोणीतरी धनाढ्य ती खरेदी करू शकेल. आता जास्त बोली लावणाऱ्याला ज्ञान विकले जातेे. सत्तेवर मांड ठोकण्यासाठी राजकारणी लोकांनी शालेय पाठ्यपुस्तकांनाही सोडलेलं नाही. लक्ष्मी एक महत्त्वपूर्ण देवी आहे यात काहीएक शंका नाही. त्यांच्याशिवाय कोणत्याही झाडाला फळ लागणार नाही, जनावरं उपाशी राहतील आणि राजे-महाराजांची शान आणि सत्ता नष्ट होईल. देवतांनी क्षीरसागर मंथनामधून जेव्हा लक्ष्मीला बाहेर काढले तेव्हा ती सोबत संपन्नता घेऊन आली. म्हणूनच यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही की, देव आणि दानव दोघांनाही लक्ष्मी हवी होती. लक्ष्मी राजा आणि देवतांभोवती फिरायची. प्रत्येकाला थोडे यश दिल्यानंतर ती तिथून निघून जायची. लक्ष्मीच्या अशा चंचल स्वभावामुळे त्यांना “चंचला’ असं म्हटलं जातं. असुरांचं म्हणणं होतं की, लक्ष्मी अस्थिर आहे आणि देवांचा आरोप होता की लक्ष्मीच्या अपेक्षा खूप असतात. शेवटी विष्णूचं शाश्वत प्रेम त्यांना मिळालं. विष्णू त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ओळखले जातात. ब्रह्मांडाचे संरक्षण करतानाच नियम आणि धर्म यांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. इतरांप्रमाणे विष्णूने लक्ष्मीचा कधीच पाठलाग केला नाही. उलट देवीनेच त्यांची निवड केली. विष्णू आपल्या कामासाठी कटिबद्ध  आणि तटस्थ होते. या गोष्टींमुळेच लक्ष्मी त्यांच्याकडे आकर्षित झाली. त्या दोघांच्या एकत्र येण्याने एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे म्हणजेच धन आणि सत्ता आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकेल, पण त्यामुळे आयुष्य पूर्ण होत नाही. मग आयुष्य काय आहे? जर पैसा आणि सत्ता हेच मार्ग आहेत तर मग जीवनाचा उद्देश काय आहे?

सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याशिवाय इतर कोण देणार? भौतिक सुखांपासून मुक्त होण्यासाठी ब्रह्माला त्यांच्यासोबत राहायचं होतं. असं म्हणतात की, भौतिकतेची देवी शतरुपावर ब्रह्मा इतके प्रभावित झाले होते की तिला प्रत्येकक्षणी समोर पाहण्यासाठी त्यांनी पाच मुख आपल्या धडावर लावले. ब्रह्मा यांचा लोभ नियंत्रणात आणण्यासाठी शंकराने त्यांचे एक शिर कापले होते. या घटनेनंतर ब्रह्मा गंभीर झाले आणि तेव्हा सरस्वतीसोबत राहून त्यांनी आपले चंचल मन नियंत्रणात आणले. लक्ष्मीप्रमाणे सरस्वती ही फुलांनी किंवा रत्नांनी स्वत:चा शृंगार करत नाही. ती पांढऱ्या रंगाची साडी परिधान करते, जी बाह्यसुखांच्या, मोहमायेच्या अगदी विपरीत गोष्ट आहे. सरस्वती शक्तीच्या कोणत्याही प्रतीकाशी निगडित नाही. ती एका हंसावर विराजमान होते की जो विवेक आणि तटस्थतेचे प्रतीक आहे. हंसाबद्दल असं म्हटलं जातं की, त्याच्यात “दूध का दूध और पानी का पानी’ करण्याची क्षमता असते. जो एक विवेकवादीच करू शकतो. म्हणूनच हंसाचा संबंध विवेकाशी जोडला जातो. हंसाचा संबंध तटस्थतेशी जोडला जातो कारण पाण्यात असूनही त्याला पाण्याचा मोह नाही, तो कधीही उडून जाऊ शकतो आणि जेव्हा तो उडतो तेव्हा त्याच्या पंखांवर पाण्याच्या एका थेंबाचाही अंश नसतो.

लक्ष्मी आणि सरस्वती या जीवनाच्या दुहेरी उद्देशांची प्रतीकं आहेत. जिथे आपण विचार करतो की आपली इंद्रिये आनंदित राहावीत, तिथे आपण हादेखील विचार करतो की आपल्या आत्म्याला मोक्ष मिळावा. परंतु या दोन्हींचा समन्वय साधणे कठीण आहे. यावर जैन तत्त्वज्ञान म्हणतं की एकाच वेळी तुम्ही चक्रवर्ती (सम्राट) आणि तीर्थंकर (सिद्धपुरुष) नाही बनू शकत. यावरचा एक उपाय आपल्याला वानप्रस्थाश्रमात मिळू शकतो. यानुसार गृहस्थाश्रमात आयुष्याचा आनंद घेतला आणि नंतर सन्यासी बनण्यासाठी संसाराचा त्याग केला. म्हणूनच असे म्हणावे लागेल की आपण एक तर सरस्वतीच्या हंसावर बसून उडू शकतो किंवा लक्ष्मीच्या कमळावर टिकून राहू शकतो.