आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयाची भूमिका महत्त्वाची का आहे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदत्त पटनायक  

मानवाच्या कल्पनाशक्तीमुळे त्याला केवळ तर्काच्या आधारे आपण नियंत्रित नाही करू शकत. हे जर आपण मान्य केलं तर व्यवस्थापनात भीतीचे ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. इच्छा, महत्त्वाकांक्षा, आमिष, नियंत्रण आणि यश या गोष्टी व्यक्ती किती भयभीत होतो यावर निर्धारित असतात, फक्त गरज या गोष्टींची आहे की कंपन्यांनी आपला तळहात वर करून अभयतेचे आश्वासन दिले पाहिजे.
 
हिंदू देवतांची छायाचित्रे पाहा. या प्रत्येक चित्रात देवी-देवतांनी त्यांचा तळहात वर केलेला दिसतो. त्याचे दोन अर्थ आहेत. एक ते आशीर्वाद देतात किंवा दुसरे म्हणजे ते आश्वासन देतात की “घाबरू नका’ म्हणजे निर्भय बना. “घाबरू नका’ या आश्वासनाचा विचार केला तर लक्षात येईल की पूर्वीच्या काळीसुद्धा लोक घाबरायचे. म्हणजेच, दैनंदिन जीवनात भीतीचं एक स्थान होतं. लोकांना भीतीचं महत्त्व चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळेच कदाचित जगाची निर्मिती अशी झाली आहे.

भीतीमुळे तणाव निर्माण होतो, याची सर्वात आधी सुरुवात सजीवांमध्ये झाली. कारण त्यांच्यापुढे जिवंत राहण्याचे आव्हान होते. त्यांनी हे आव्हान स्वीकारून मृत्यूपासून वाचण्यासाठी येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा निश्चय केला. पृथ्वीवर जसजशी सजीवांची संख्या वाढत होती, त्यानुसार अन्न मिळविण्यासाठी त्यांची स्पर्धा वाढू लागली. पण इथं वेगळ्या घटना पण घडत होत्या. सजीवांची संख्या जशी वाढत होती त्यासोबतच म्युटेशनची पण प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेमुळे सजीवांच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढल्या. सजीवांची विविधता वाढली. 

सजीवांमध्ये अजून बदल घडले. दोन पद्धतीच्या सजीवांची निर्मिती झाली. एक चर म्हणजे जे चालू शकतात जसे सर्व पशुपक्षी आणि प्राणी. दुसरे म्हणजे अचर म्हणजे असे जे चालू नाही शकत म्हणजे वनस्पती. यामध्येसुद्धा तणाव आणि जगण्याचा संघर्ष होताच. एक रोपटे कुठेच पळ काढू शकत नाही जे प्राणी त्याला खातात, जे मोठे प्राणी लहान प्राण्यांना खातात ते लहान प्राणी यांच्यापासून पळ काढू शकतात. ही भीतीची भूमिका आपण बघू शकतो. अन्नसाखळीमध्ये जनावरांमध्ये यामुळे भय निर्माण झाले आहे. आपण दुसऱ्या प्राण्याचे शिकार बनले जाऊ शकतो याची भीती त्यांच्यात निर्माण होते.

पण माणूस हा अजब प्राणी आहे. त्याच्याजवळ असे मन आहे की जे कोणत्याही प्रकारच्या कल्पना करू शकते. त्यामुळे आपण स्वत:बद्दल जशा कल्पना करतो तशाच कल्पना दुसरी व्यक्तीही करू शकते या संकल्पनेनेच भीतीची निर्मिती होते, कोणीतरी आपल्याला अमान्य करेल किंवा आपला स्वीकार करणार नाही. आपण आपल्या आयुष्यात एक दर्जा आणि समर्थनाच्या अपेक्षेत असतो. आपण नेहमी आपल्या प्रतिस्पर्ध्यांंपेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी, त्यांच्यापासून आपल्या प्रतिमेचे संरक्षण करण्याची धडपड करत असतो. इथूनच आपल्या भीतीची निर्मिती होत असते.

भीतीला आपण जर आर्थिक, राजकीय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर वेगवेगळे अर्थ समोर येतात. आर्थिकदृष्ट्या भीतीचा अर्थ लावला तर आपल्याला संपत्ती कमवताना भीती वाटत असते, आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकतो काय? राजकीयदृष्ट्या पाहिलं तर आपल्या प्रतिस्पर्ध्याशी लढण्याइतकी शक्ती आपल्यात निर्माण करण्याची भीती असते. आपल्याला योग्य पद्धतीने जीवन जगता येईल का ही गोष्टपण एक भीतीचं वातावरण निर्माण करते. जर आपण कॉर्पोरेट व्यवसायाचा विचार केला तर  पूर्ण प्रक्रियेमध्ये भीतीची तात्त्विक भूमिका दिसून येईल. 

कर्मचाऱ्यांना किंवा व्यवस्थापकांना सतत ही भीती असते की कुणीतरी त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहे. आॉडिटर्सना त्यांच्या कामाची भीती वाटते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सतत लक्ष ठेवावे लागते. ही स्थिती प्रत्येकाची असते. फक्त वरिष्ठ पदाधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी बदलत जातात. अशा पद्धतीने कॉर्पोरेट जगातील भीतीचे वातावरण आपल्या नात्यांना आकार देत असते. पण असं असूनदेखील व्यावसायिक शिक्षणात या भीतीच्या वातावरणाबद्दल कोणतेही शिक्षण दिले जात नाही. जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हे ज्ञान दिसत नाही. ते फक्त कुशल योद्धा असतात, पण नेमका संघर्ष कुणासोबत करायचा हे त्यांना माहीत नसते.

मानवाच्या कल्पनाशक्तीमुळे त्याला केवळ तर्काच्या आधारे आपण नियंत्रित नाही करू शकत. हे जर आपण मान्य केलं तर व्यवस्थापनात भीतीचे ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. इच्छा, महत्त्वाकांक्षा, आमिष, नियंत्रण आणि यश या गोष्टी व्यक्ती किती भयभीत होतो यावर निर्धारित असतात, फक्त गरज या गोष्टींची आहे की कंपन्यांनी आपला तळहात वर करून अभयतेचे आश्वासन दिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...