पुराणकथा / वरुण देवता

राजस्थानच्या सिरोही येथे नवव्या शतकातील मीरपूर जैन मंदिरात असलेली इंद्र-इंद्राणीची प्रतिमा. वैदिक काळात वरुण देवतेला इंद्राचे रूप मानले गेले आहे. राजस्थानच्या सिरोही येथे नवव्या शतकातील मीरपूर जैन मंदिरात असलेली इंद्र-इंद्राणीची प्रतिमा. वैदिक काळात वरुण देवतेला इंद्राचे रूप मानले गेले आहे.

वैदिक काळात ग्रीष्म ऋतूमध्ये यज्ञ केला जायचा तो अशासाठी की इंद्राला पाऊस पाडण्याची शक्ती मिळावी

दिव्य मराठी

Aug 04,2019 12:08:00 AM IST

चातुर्मासाच्या या चार महिन्यांत असुर आणि राक्षस देवांपेक्षा जास्त शक्तिशाली होतात. काळ्या मेघांचे रूप धारण करून, हे असुर आकाशात वावरतात आणि पाणी अडवून ठेवतात. जेव्हा इंद्र त्याच्या मेघगर्जनेसह आपल्या वज्राने त्यांच्यावर वार करतो तेव्हा पाऊस पडतो. वैदिक काळात ग्रीष्म ऋतूमध्ये यज्ञ केला जायचा तो अशासाठी की इंद्राला पाऊस पाडण्याची शक्ती मिळावी.

मुंबई किंवा भारतातील काही मोठी शहरे पावसाळ्यामध्ये नेहमी चर्चेत असतात. अनेकांची त्यावेळी चर्चा सुरू होते की वरुण देवाचा हा प्रकोप आहे. कोण आहे हा वरुण देव...? इंद्र म्हणजे वरुण देव का...? नक्कीच अनेकांपैकी इंद्रालाही वरुण देव म्हणून म्हटले जात असले तरी इंद्राचे एखादे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? खरं म्हणजे वर्षा ऋतूत हिंदू धर्माचे सगळेच देव निद्रावस्थेत असतात.]


चातुर्मासाच्या या चार महिन्यांत असुर आणि राक्षस देवांपेक्षा जास्त शक्तिशाली होतात. काळ्या मेघांचे रूप धारण करून, हे असुर आकाशात वावरतात आणि पाणी अडवून ठेवतात. जेव्हा इंद्र त्याच्या मेघगर्जनेसह आपल्या वज्राने त्यांच्यावर वार करतो तेव्हा पाऊस पडतो. वैदिक काळात ग्रीष्म ऋतूमध्ये यज्ञ केला जायचा तो अशासाठी की इंद्राला पाऊस पाडण्याची शक्ती मिळावी. वैदिक कवींनी मेघगर्जना करणाऱ्या काळ्या ढगांना चित्कार करणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाची उपमा दिलेली आहे. कवींच्या कल्पनेत इंद्र पांढऱ्या हत्तीवर स्वार होत असे. पांढरा हत्ती पांढऱ्या ढगांचे प्रतीक होता, जे खुल्या आकाशाला जोडलेले होते. गजराजाला प्राचीन काळापासून पाण्याशी जोडले गेले आहे. असेच यक्षांचाही पाण्याशी संबंध लावण्यात आला आहे. त्यांच्या सुटलेल्या पोटांची मोठाल्या ढगांशी सांगड घालण्यात आली आहे.


वैदिक काळात पूर्वी वर्षा आणि वादळांचे देव होते. आता, सर्व जण त्यांना विसरले आहेत. परंतु ऋग्वेदाच्या ५ व्या विभागाचा ८३ वा श्लोक हे या देवांच्या प्रशंसेसाठी लिहिलेले एक सुंदर विधान आहे. कवी झाडांचा विध्वंस करणाऱ्या लखलखणाऱ्या-गडगडणाऱ्या विजेला सारथीच्या घोड्याला हिंसक चाबुक मारण्यासारखे समजतात. अशी कल्पना आहे की, पाऊस बीज जमिनीत अंकुरण्याचं काम करतो. कारण पावसाचे पाणी पृथ्वीला समतोल बनवते, म्हणूनच पावसाला पाण्याने भरलेल्या उलट्या बादलीसारखं म्हटलं जातं. तलाव पावसाने भरून जातात आणि गवत-झाडे देखील रसांनी परिपूर्ण होतात.


पण शेवटचा श्लोक वेगळा आहे. पावसामुळे पृथ्वी ताजीतवानी होते. लोकं यामुळे आनंदी होतात आणि पावसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, तर अतिवृष्टी असह्य झाल्यावर पाऊस थांबला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली जाते. तीन हजार वर्षापूर्वी वैदिक संस्कृतमध्ये लिहिलेल्या या कविता लोकांच्या भावना उलगडून दाखवतात. ५व्या विभागाच्या १०१ व्या श्लोकात पावसाचे कामुक वर्णन केले आहे. परंतु त्याचे स्वरूप बदलत जाते.. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा त्याला ओसाड म्हटलेे जाते आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बीजारोपण करणारा पाऊस असे म्हटले गेले आहे. तो चर (प्राणी) आणि अचर (झाडं) या दोन्ही विश्वाचे स्वामी आहेत. रुपकाद्वारे समजून घेतल्यास सगळी झाडं झुडपं आणि प्राण्यांपासून दूध, मध आणि बियाणे मिळतात. त्यांच्या दैवी स्वरूपाचे संदर्भात कौतुक हे तीन स्वरुपात केले गेले आहे: तीन विश्व, वाहत्या पाण्याच्या तीन अवस्था, तीन भाषा आणि तीन बादल्यादेखील.


वर्षा ऋतूत तयार झालेल्या वातावरणात धरतीला आणि झाडांना नवीन जीवन प्राप्त होते. त्यांच्या आनंदाचे स्मरण म्हणून रचलेला १०२ वा श्लोक पावसाची प्रशंसा करतो. १०३ व्या श्लोकात ग्रीष्म ऋतूत रोडावलेल्या बेडकाचे पुनरुज्जीवन होऊन ते कसे डराव डराव करतात यासंबंधी लिहिले आहे. ब्राह्मण मुले अर्थ समजून न घेताच करता श्लोकांचे पाठांतर करतात. सोम रिवाजच्या वेळी पुजारीही एकाच स्वरात मंत्रोच्चार करतात. कवी म्हणतो की, हे अगदी नर बेडकाच्या आवाजांसारखे आहेत. मादी बेडूक या आवाजांमुळे नर बेडकाकडे आकर्षित होतो आणि त्यांच्या मिलनाने नवे जीवन सुरू होते. त्याच प्रकारे मनुष्याच्या आयुष्यातही जोडप्यांमध्ये एक नवा आनंद प्राप्त होतो.


या पद्यांमध्ये, कवी पावसाच्या जीवनदायी स्वरुपाबद्दल बोलतात. मिलनासाठी बेडूक एकत्र टराव टराव करतात. दुसरीकडे, शेताची सुपीकता वाढवण्यासाठी सोम रिवाजात पुजारी, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांची मुले एका सुरात स्तोत्रांचे पठण एका स्वरात करतात. कवी बेडूक आणि मानवांची तुलना करतो पण, केवळ हलक्या मजेशीर स्वरूपात. या सजीव श्लोकांद्वारे असे कळते की ऋग्वेदातील कवी निसर्गाचे गुण गात त्यांना वैदिक लोकांसाठी दैवी रूप देतात आणि एकत्रितपणे त्यांच्या देवतांचीही उपासना करतात.


इथे भौतिक आणि मानसिक जगाचा संबंध कविता आणि रूपकाद्वारे जोडला गेला आहे. लोकांन प्रेरित करून देवतांबद्दल जागृत ठेवले जात आहेे. येथे सांगण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही, फक्त जीवन आणि निसर्गाचे सजीव वर्णन आहे. आम्हाला पावसाळ्याच्या सभोवतालचा ताजेपणा आवडतो, परंतु आम्हाला त्याच्या तीव्रतेची भीती वाटते. झाडांच्या आडोशाखाली किंवा गुहेचा आसरा घेत पावसाचे वैभवरुू पाहून कवींना पण असंच वाटलं असेल.

X
राजस्थानच्या सिरोही येथे नवव्या शतकातील मीरपूर जैन मंदिरात असलेली इंद्र-इंद्राणीची प्रतिमा. वैदिक काळात वरुण देवतेला इंद्राचे रूप मानले गेले आहे.राजस्थानच्या सिरोही येथे नवव्या शतकातील मीरपूर जैन मंदिरात असलेली इंद्र-इंद्राणीची प्रतिमा. वैदिक काळात वरुण देवतेला इंद्राचे रूप मानले गेले आहे.