Magazine / कार्तिकेयाची कथा...

सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे

देवदत्त पटनायक

Jun 16,2019 12:08:00 AM IST

सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाची मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्यावेळी दुर्गेजवळ ठेवलेली आढळते. मात्र, दक्षिण भारतात नेमके याउलट घडते. कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो.

कौरवांना युद्धात मारल्यानंतर पश्चात्तापाने पछाडलेल्या युधिष्ठिरने कुरुक्षेत्राजवळ भगवान शंकराचा मुलगा म्हणजे कार्तिकेयाचे मंदिर बांधले, असे म्हणतात. आजही हे मंदिर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्रानजीकच्या पिहोवा शहरात आहे. उत्तर भारतातील कदाचित एकमेव असलेल्या या मंदिरात कार्तिकेयाची ब्रह्मचाऱ्याच्या रूपात पूजा केली जाते. असे असले तरी सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाच्या अधिक मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी दुर्गेजवळ ठेवलेल्या आढळतात. मात्र याउलट कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो. तामीळनाडूच्या पलनी शहरात उंच डोंगरावर कार्तिकेयचे भव्य मंदीर अतिशय प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे इथे ब्रह्मचारी रुपात कार्तिकेय नसून दोन पत्नींसह त्याची मूर्ती दिसते. इंद्राची कन्या सेना ही पहिली पत्नी तर पृथ्वीची कन्या वल्ली ही दुसरी पत्नी होय... कार्तिकेयला दक्षिणेकडे मुरुगन म्हणूनही संबोधतात. अति प्राचीन तमिळ संगम साहित्यात असे उल्लेख आढळतात... उंच डोंगरावर, हातात भाला पकडणारा लाल रंगाचा एक देखणा पुरूष जो स्वर्ग आणि पृथ्वी या दोहोंचाही समन्वय साधून आहे... अशारितीने उत्तर भारताचा ब्रह्मचारी कार्तिकेय आणि दक्षिण भारताचा विवाहित मुरुगन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.


भारतीय आख्यायिकांनुसार पिढ्यानपिढ्यांपासून आपल्या पुराण कथेंमध्ये बदल होत गेला आहे. हा बदल जसा कथेंमध्ये झाला तसाच स्थळ आणि काळामध्येही होत गेला. वेदांपासून पुरणांपर्यंत प्रत्येक प्रथेमध्ये बदलाव झाला. म्हणूनच वेदांमध्ये कार्तिकेयचा फारसा उल्लेख नाही तर पुराणांत मात्र त्याला शंकराच्या कुटुंबाचा सदस्य मानला गेला आहे.


२३०० वर्षांपूर्वी मौर्य कालखंडात आणि कुषाण काळात कार्तिकेयला मोठे महत्व देण्यात आले होते. मोरावर स्वार असलेल्या कार्तिकेयचा मंगळ ग्रहाशी संबंध जोडण्यात आला होता. युद्ध देवता आणि या देवतांचे सेनापती असलेले कार्तिकेय यांच्या अनेक मुर्त्या स्थापन केल्या जायच्या. परंतु हळूहळू राजेमहाराजांसोबत कार्तिकेयची जागा दुर्गाने घ्यायला सुरूवात केली आणि कार्तिकेयचे महत्त्व कमी झाले.


कालिदास लिखित "कुमारसंभव'नुसार तारकासुरला माारण्यासाठी देवांना एक महान योद्ध्याची गरज होती. ब्रह्मदेवाने सांगितले की असा वीर सुपुत्र फक्त शंकर देऊ शकतो. मात्र तोपर्यंत शंकर ब्रह्मचारी होते आणि त्यांनी कामदेवाला भस्मही करून टाकले होते. त्यामुळे देवीने पार्वतीचे रुप घेऊन शंकराशी विवाह करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल. अशापद्धतीने शंकराचा गृहस्थाश्रमात
प्रवेश करण्यासाठी कार्तिकेय हा निमित्त ठरला आहे.


पुराणात मात्र वेगळीच कथा आहे. त्यानुसार शंकर-पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे बीज अग्नीत पडले. परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू शकले नाहीत आणि त्यांनी ते बीज "वायू'कडे सोपवले. वायूलाही ते सांभाळता आले नाही आणि त्याने ते बीज गंगा नदीत सोडले. गंगेचे शीतल पाणीही या प्रखरतेला थंड करू शकले नाही उलट गंगेचे पाणीच या बिजामुळे उकळू लागले आणि आजूबाजूचे जंगल वणव्यासारखे पेटू लागले. हे अग्नीतांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी कमळाच्या फुलामध्ये सहा अपत्ये दिसू लागली. कृतिका नक्षत्रांमधून सहा कृतिका खाली अवतरल्या आणि त्यांनी या सहा अपत्यांना स्वीकारले. शेवटी पार्वतीने या सहाजणांना एकत्र जोडले. या मुलाला सहा तोंडे होती आणि त्याच्यात सहाजणांची शक्ती होती. त्या शक्तीवान बालकाने तारकासुराचा वध केला. दक्षिण भारतात त्याने सुरपद्मला मारले असा उल्लेख आहे. एक महान योद्धा म्हणून त्याला दक्षिण भारतात पुजले जाते. परंतु कथेत असे म्हटले गेले आहे की, शंकर आणि कार्तिकेयमध्ये मतभेद होते, ज्यामुळे कैलाश पर्वत सोडून अगस्ती ऋषीसोबत कार्तिकेय दक्षिण भारतात निघून गेला आणि म्हणूनच कार्तिकेयची पुजा आता उत्तर भारताऐवजी दक्षिणेकडे अधिक होते.

X
COMMENT