आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृग राजाचा धर्म!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अशा काळात आहोत जिथे राजा हा विदुषकावर नाही तर कवींवर प्रेम करतो. विदुषकाला कधी दरबारातील नवरत्नाचा किताब मिळत नाही. टीकाकारांचा गळा घोटला जातो. याचाच दुसरा अर्थ राजाला केवळ चमचे हवे असतात जे त्याची फक्त स्तुती करतील.

 

पुराणात राजा नृगची एक विलक्षण कथा आहे. राजा नृगला शाप मिळाला होता की त्याचे पालीमध्ये रुपांतर होईल. नृग राजा गोदान करायचा. एकदा त्याने जी गाय दान दिली होती, ज्या व्यक्तीला दान मिळाले होते तिथून त्या गायीने पळ काढला आणि पुन्हा राजाच्या गोशाळेत ती दाखल झाली. त्याच गायीला पुढे आणखी एका व्यक्तीला दान दिले. आता ज्या दोन व्यक्तींना गाय दान म्हणून मिळाली होती त्या दोघांनीही दावा ठोकला की ही गाय आमची आहे आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. न्याय मिळण्यासाठी शेवटी दोघेही राज दरबारात दाखल झाले. ही गाय तुम्ही मला दिली होती असा दावा दोघांनीही केला. राजाला एव्हाना कळून चुकले होते की त्याच्याकडून एकच गाय दोघांना दान देण्याची चुक झाली होती. राजाने क्षमा मागितली आणि सांगितले की, दोघांपैकी जो कोणी या गायीवरचा ताबा सोडून देईल त्याला मी तब्बल शंभर गायी दान देईन... परंतु दोघांपैकी कोणीच ऐकेना, दोघांनाही तिच गाय हवी होती. निर्णय होईना आणि मग संतापलेल्या दोघांनीही थेट राजालाच शाप दिला की, जोपर्यंत भुलोकात श्रीकृष्णाला भेटत नाही तोपर्यंत राजाला पालीच्या रुपात रहावे लागेल. जवळपास एक सहस्त्र वर्षांपर्यंत राजाला पालीच्या रुपात रहावे लागले आणि तेही एका मोठ्या विहिरीमध्ये. पुढे कृष्ण युग सुरू झाले. भागवत पुराणानुसार काही यदुवंशीय राजकुमार फिरण्यासाठी एका उद्यानात गेले होते. तिथे त्यांना तहान लागली आणि त्यांना ती विहिर आढळली. पाणी पिण्यासाठी जेव्हा ते विहिरीत डोकावले तेव्हा त्यांना लक्षात आले की विहिरीत पाणी तर नाहीये परंतु एक विशाल पाल निपचित होऊन पडली आहे. त्या पालीला बाहेर काढण्याचा राजकुमारांनी अतोनात प्रयत्न केला परंतु त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मग त्यांनी श्रीकृष्णाकडे धाव घेतली. कृष्ण आश्चर्यचकीत झाले आणि ते त्या विहिरीजवळ पोहचले. त्यांनी अगदी सहजपणे त्या पालीला बाहेर काढले. ज्या क्षणी कृष्णाच्या हातांचा पालीला स्पर्श झाला त्याच क्षणी पालीचे पुन्हा नृग राजामध्ये रुपांतर झाले.
ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वातही आढळते. धर्माचा अर्थ समजावून सांगण्यासाठी भीष्माने ही कथा पांडवांना सांगितली होती. भीष्माच्या अनुसार सगळ्या लोकांना सुखी ठेवणे हेच राजाचे कर्तव्य आहे. अजाणतेपणी का होईना राजाने जर कोणाला दु:खी केले तर त्याला शाप मिळू शकतो. ही कथा यासाठी महत्वाची आहे कारण राजा नृग हा रामाचा पूर्वज होता. त्याचा जन्म सुर्यवंश किंवा इक्षवाकु वंशात झाला होता. याच वंशामध्ये अनेक नामांकित जैन मुनींनी जन्म घेतला होता. काहींचे तर असेही म्हणणे आहे की भगवान बुद्धाचा जन्मही याच वंशात झाला होता.

 
आज आपण अशा युगात राहतोय जिथे राम राम म्हणत आपण एकमेकांचे स्वागत तर करतो, राम राज्याचा उदोउदो करतो परंतु राजधर्म काय आहे हेच माहित नसतं. आपल्या कर्माचे उत्तरदायित्व आपण स्वीकारत नाही. रामापासून किती वेगळं आहे हे. हे वेगळेपण एका लोककथेद्वारे कळू शकेल. सुर्यवंशाचे असूनही रामचंद्रच्या नावात चंद्र आहे... असे म्हणतात हे नाव स्वत: रामानेच निवडले होते. त्यांचा सीतेसोबतचा व्यवहार चांगला नसल्यामुळे सीता रामाला सोडून गेली. म्हणूनच रामाने म्हटलं होतं की, जसे सुर्याला ग्रहण लागते त्याचप्रमाणे सीतेशिवाय माझे आयुष्य म्हणजे माझ्यामुळेच लागलेले एक ग्रहण आहे. म्हणूनच त्यांनी रामचंद्र या नावाचा स्वीकार केला.


धर्माबद्दल एनक कथा प्रचलित आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर राजा विक्रमादित्य आणि राजा भोज यांचे देता येईल. या सगळ्या कंथांमधून एकच गोष्ट वारंवार अधोरेखित होते ती म्हणजे शक्तीशाली व्यक्तीने शक्तीहीन व्यक्तीला केलेली मदत. राजधर्माचा अर्थ आहे आपल्या कर्मांचे उत्तरदायित्व स्वीकारणे. जोपर्यंत तुम्ही ते नाही करत तोपर्यंत राम आणि रामराज्याबद्दल बोलणं हे एक थोतांड आहे. आपण अशा काळात आहोत जिथे राजा हा विदुषकावर नाही तर कवींवर प्रेम करतो. विदुषकाला कधी दरबारातील नवरत्नाचा किताब मिळत नाही. 
टीकाकारांचा गळा घोटला जातो. याचाच दुसरा अर्थ राजाला केवळ चमचे हवे असतात जे त्याची फक्त स्तुती करतील. 


समाज निरोगी राहण्यासाठी टीका ही आवश्यकच असते हे त्यांना कळत नाही. टीकेला ते निंदा समजतात आणि तिथेच त्यांची गडबड होते. 


जंगलात जंगल राज असणे हाच राजनितीचा अर्थ आहे. जेव्हा मनुष्य जंगल राजचा स्वीकार करतो तेव्हा त्या मत्स्य न्यायाला अधर्म म्हटले जाते. मनुस्मृतिच्या अनुसार देवतांनी राजे-महाराजे यांच्या रुपात यासाठी जन्म घेतला होता की मत्स्य न्यायाच्या विरुद्ध समाज निर्माण करता येईल, ज्यालाच धर्म असेही म्हणतात. राजनितीमध्ये शक्तीशाली हा जिंकतोच दुर्बलांनाही समाज-संस्कृतीत स्थान आणि आदर मिळेल तीच खरी राजनिती...

बातम्या आणखी आहेत...