आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाची पूजा दहा दिवस सुरू असते. या प्रक्रियेत अगोदर त्यांना आवाहन केले जाते आणि शेवटी विसर्जन. प्राचीन काळी आवाहन करतेवेळी एका पानावर हळदीचं उटणं लावून पूजा केली जायची. गणेशाचा जन्म हा शक्तीमुळे झाला आहे हे या कृतीतून दाखवून दिले जायचे. पानांवर सुपारी ठेवली जायची, कारण गणेशाचे हत्तीचे शीर होते. त्याचीही पूजा केली जायची. गणेशाचे हे रूप वनस्पती किंवा धरणीमातेतून उगवलेल्या वस्तूंनी बनवले जायचे. म्हणूनच धरणीमातेला गौरीचे रूप मानले जाते आणि गौरीला गणेशाची माता...
 
वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी हत्ती ठरावीक मोसमात मदावर किंवा माजावर येतात, ज्याला संस्कृतमध्ये मदमस्त हत्ती म्हटले जाते. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. मदिरा आणि मदहोश हे शब्ददेखील "मद'पासूनच तयार झाले आहेत. मदन म्हणजे कामदेव हे नावही याच शब्दापासून आहे. संस्कृत काव्यामध्ये मदमस्त हत्तीला कामवासनेचे प्रतीक मानले गेले आहे.

असे म्हटले जाते की, भगवान शंकरने गजासुर नावाच्या एका असुराची जिवंत असतानाच चामडी सोलून काढली आणि ते चामडे अंगावर घालून शंकर फिरू लागले. म्हणूनच शंकराला गजांतक असेही म्हटले जाते. दक्षिण भारताच्या अनेक मंदिरामध्ये गजांतकच्या रुपातील शंकराची मुर्ती पाहायला मिळते. गजांतकची मुर्ती ही मदमस्त हत्तीच्या विनाशाचे प्रतीक आहे. गजासुराचे शीर कापल्यानंतर शंकराने किंवा गजांतकने ते शीर आपल्या मुलाच्या धडाला लावले ज्यातून गणेशाची निर्मिती झाली.

अशा प्रतिकांमधून काय सांगितले जाते? हत्ती हे धन-धान्य आणि संपत्तीचे प्रतीक आहे, म्हणूनच त्याला लक्ष्मीशी जोडले गेले आहे. हत्ती कामवासनेचेही प्रतीक आहे म्हणून गजांतकच्या मुर्तीबद्दल बोलले जाते. परंतु सबंध जग हे कामवासना आणि इच्छांवर सुरू आहे. वैराग्यमूर्ती शंकराच्या मुलाचे प्रतीक आहे हत्ती... इथे जरा गडबड दिसते. एकीकडे वैराग्याचे प्रतीक आहे शंकर आणि दुसरीकडे गृहस्थाश्रमाचे प्रतीक आहे गणेश... गणेशाच्या हातात नेहमी एक अंकुश दिसतो. याच अंकुशाच्या मदतीने हत्तीला वश करण्यासाठी माहूत त्याचा वापर करत असतो. कदाचित यावरून असे सुचित करायचे असेल की, आपल्या भावना आणि इच्छांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे अन्यथा त्यामुळे नाश होऊ शकतो. कदाचित हेच ज्ञान गणेश वंदनामुळे मिळते.

विलासी देवराज इंद्राचे नाव वैदिक इंद्रियांशी जोडले गेले आहे. कदाचित गजांतक या विलासी जीवनाविरुद्धचे एक प्रतीक आहे. गजानन वा गणेशाच्या माध्यमातून भगवान शंकराला शांत केले जात आहे आणि त्यांच्या वैराग्याची गृहस्थाश्रमाशी सांगड घातली जात आहे. हे अशासाठी की अध्यात्मिक आणि व्यावहारिक आयुष्यात एकप्रकारचे संतुलन साधले जाईल. 

गणेशाची पूजा दहा दिवस सुरू असते. या प्रक्रियेत अगोदर त्यांची स्थापना केली जाते आणि शेवटी विसर्जन. प्राचीन काळी आवाहन करतेवेळी एका पानावर हळदीचे उटणं लावून पुजा केली जायची. गणेशचा जन्म हा शक्तीमुळे झाला आहे हे या कृतीतून दाखवून दिले जायचे. पानांवर सुपारी ठेवली जायची कारण गणेशाचे हत्तीचे शीर होते. त्याचीही पुजा केली जायची. गणेशाचे हे रुप वनस्पती किंवा धरणीमातेतून उगवलेल्या वस्तूंनी बनवले जायचे. म्हणूनच धरणीमातेला गौरीचे रुप मानले जाते आणि गौरी गणेशाची माता आहे.

पूजा संपन्न झाल्यावर त्यांना नदी किंवा पाण्यामध्ये सोडले जायचे. स्थापना आणि विसर्जनाची परंपरा वैदिक काळापासून सुरु झाली. तेव्हा असे म्हटले जायचे की, देवता आपल्या घरी पाहुण्यांच्या रुपात येतात आणि काही दिवस मुक्काम करून निघून जातात. म्हणून पाहुण्यांना देवासमान म्हटले जाते. 

प्राचीन काळी यज्ञसोहळा पार पडल्यानंतर यज्ञशाळेला आग लावण्यात यायची. पौराणिक काळात अगदी त्याचप्रमाणे वनस्पती किंवा मातीपासून बनवलेल्या देवीदेवतांच्या मुर्त्या ज्या आपल्या शरीराप्रमाणे नश्वर असतात त्याचेही एक प्रतीक बनवले गेले. गणेशाची पुजा आणि विसर्जन हेच दाखवून देतात की जसे दर वर्षी ते येतात आणि जातत तसेच झाडेझुडपे, सुख-दु:खदेखील येतात आणि जातात. या जगात सगळं काही नश्वर आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...