आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Development Only Possible Through Peace, Unity And Prosperity : Prime Minister Narendra Modi

शांतता, एकता, साैहार्दातूनच विकास शक्य : पंतप्रधान; भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मार्गदर्शन

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : शांतता, एकता आणि साैहार्दातूनच विकास शक्य आहे, ही गाेष्ट कायम लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच भाजपच्या खासदारांनी समाजात वावरताना शब्दातून किंवा कृतीतून समाजात हा विश्वास निर्माण केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. ते मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करत हाेते.

माेदींनी आपल्या भाषणातून माजी पंतप्रधान डाॅ. मनमाेहन सिंग यांच्यावर टीका केली. ‘भारत माता की जय’ या जयघाेषातूनही माजी पंतप्रधानांना चुकीचा वास यायचा. ते त्याकडे संशयातून पाहायचे. या घाेषणेचा गैरवापर केला जात आहे. कट्टरवाद व भावनिक स्वरूपातील मांडणीसाठी हा वापर केला जाताे. परंतु आयडिया आॅफ इंडियामध्ये विविध प्रकारच्या लाखाे लाेकांचा समावेश आहे, असे सिंग म्हणाले हाेते. त्याचा समाचार माेदींनी घेतला. ‘भारत माता की जय’ म्हणणे हे ७० वर्षांनंतरही गुन्हा ठरावे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यातही पंतप्रधानपदावरील व्यक्तीने असे विधान करावे हे आणखी दुर्दैव ठरते. ‘वंदे मातरम’ असे म्हणणे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात गुन्हा ठरत असे. तेव्हा काँग्रेसच्या बैठकांत हे गाणे एेकल्यानंतर अनेक लाेक बैठक साेडून निघून जात असे पंतप्रधानांनी सांगितले. परंतु ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांनी देशाचा विकास लक्षात घेतला पाहिजे, असा टाेलाही माेदींनी उपस्थित नेत्यांना लगावला. 


बैठकीला गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इत्यादींसह अनेक नेत्यांची उपस्थिती हाेती. या वेळी माेदींनी लाेकसभा व राज्यसभेत केलेल्या भाषणांवर आधारित एका पुस्तिकेचे भाजप खासदारांना वितरण करण्यात आले. त्यातून भाजप खासदारांनी राजकीय चर्चेसाठी निश्चितपणे युक्तिवादाचे मुद्दे मिळतील, असा विश्वास भाजपचे संसदीय पक्ष सचिव बालसुब्रमण्यम कामारसू यांनी व्यक्त केला. 

विकास हाच मंत्र

िकतीही मतभेद असले तरी भाजपसाठी देश हे सर्वाेच्च असून विकास हा मंत्र आहे. शांतता, साैहार्द व एकता यातूनच विकास शक्य हाेऊ शकताे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात घेऊन प्रत्येक सदस्याने समाजात वावरले पाहिजे. संस्कृतमध्ये ‘मनसा, वाचा. कर्मणा’ असे म्हटले आहे. पक्षाच्या नेत्यांची वागणूकही अशीच एकता निर्माण करणारी असली पाहिजे, असे माेदींनी याप्रसंगी सांगितले.

‘जन औषधी केंद्रा’ च्या संचालकांशी संवाद साधणार

देशभरात जन आैषधी केंद्र चालवली जात आहेत. त्याद्वारे अनुदानावर आैषधींचा पुरवठा केला जात आहे. ७ मार्च राेजी देशातील ६ हजार ३०० केंद्रे संचालक व त्याच्या लाभार्थींशी माेदी संवाद साधणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.