आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ...बाकी मेरे पिछे आओ...अशी शरद पवारांची अवस्था आहे'- देवेंद्र फडणवीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फलटण- निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्व पक्षांनी आपल्या प्रचार सभा सुरू केल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज फलटनमध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.  'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ...बाकी मेरे पिछे आवो...अशी शरद पवारांची अवस्था असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही 15 वर्षे सत्तेत होतात, पण आम्ही फक्त 5 वर्षात जनतेचे कामे केली. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीलोत. कर्जमाफी केली, वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान आम्ही शेतकऱ्यांना दिली. आघाडीच्या सरकारने 15 वर्षात फक्त 20 हजार कोटी शेतकऱ्यांना दिली. पण, भाजप सरकारने फक्त 5 वर्षात 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...