आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सकडून टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही - फडणवीस
  • पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार या संकुचित लोकांना दिसत नाही का? - फडणवीसांचा सवाल

मुंबई - नागरिकत्व कायद्याच्या समर्थानात भाजपने आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात कायद्याच्या समर्थनात एक सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करताना विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. जाळपोळ करणाऱ्यांना परवानगी दिली जाते - फडणवीस

"तुम्ही आमची परवानग्या नाकारू शकता, आमचे मोर्चे रोखू शकता परंतु नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकारकडून परवानगी दिली जात आहे. परंतु, आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?" अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर जोरदार हल्ला चढवला. भाजपने आज ऑगस्ट क्रांती मैदानात सीएए व नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. परंतु, रॅलीदरम्यान हिंसा घडण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही. सर्व धर्मांचा सन्मान करणारा हा देश 

कुठल्याही धर्माच्या लोकांना जागा देऊन, त्यांच्या धर्माचा सन्मान करणारा भारत हा एकमेव देश आहे याचा तुम्हाला विसर पडला का? पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार झालेले या संकुचित लोकांना दिसत नाही का? असे प्रश्न फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला विचारले.