आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी तिकीट कापल्यावरुन खडाजंगी नंतर सोबत न्याहारी; जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर त्यांचे तिकीट कापल्याचा आरोप केला आहे

जळगाव- देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच माझं तिकीट कापले गेले, असा खळबळजनक आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज फडणवीस आणि महाजनांसोबत न्याहारी करताना दिसते. जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसेंनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, नाराजीचा विषय वेगळा आहे, भेटीत फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली.विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी जळगावात आगमन झाले. यावेळी भाजपचे सर्व आमदार खासदार आणि पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीला आले होते, मात्र एखनाथ खडसे हे उपस्थित नव्हते. पण, खडसे फडणवीसांची भेट घेणार असल्याचे कळवले होते. त्यानंतर फडणवीसांनी हेलिकॉप्टरचे उड्डाण 20 मिनिटे उशिरा केले. काही वेळानंतर खडसे आले आणि महाजन-फडणवीसांसोबत न्याहारी केली. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत खडसेंची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. जळगाववरुन फडणवीस पुढे नंदुरबारकडे रवाना झाले.
 

बातम्या आणखी आहेत...