Home | Maharashtra | Mumbai | Devendra Fadanvis feeling Displeasure about Pragya Sadhvis controversial statement about martyr Karkare

करकरे उमदे व प्रामाणिक अधिकारी, साध्वींनी ‘तसे’ बाेलायला नकाे हाेते; वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी

चंद्रकांत शिंदे | Update - Apr 22, 2019, 08:59 AM IST

मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरणात एनआयने क्लीन चिट दिली म्हणूनच भाजपने साध्वींना तिकीट दिले

  • Devendra Fadanvis feeling Displeasure about Pragya Sadhvis controversial statement about martyr Karkare

    मुंबई - भाेपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावर देशभरातून टीकेची झाेड उठलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘हेमंत करकरे हे उमदे आणि प्रामाणिक अधिकारी होते. देशासाठी त्यांनी बलिदान दिले. साध्वींनी त्यांचे वैयक्तिक दुःख व्यक्त केले, परंतु त्यांनी करकरेंबद्दल तसे वक्तव्य करायला नकाे हाेते,’ अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरणात एनआयने क्लीन चिट दिली म्हणूनच भाजपने साध्वींना तिकीट दिले, असे सांगत त्यांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

    ‘माेदी, फडणवीस व भाजपच्या टीकेचा राेख पवारांवरच का?’ या प्रश्नावर फडणवीस म्हणाले. ‘महागठबंधन मीच घडवून आणले, असे स्वत: शरद पवारांनीच जाहीर केले अाहे. राज्यात काँग्रेसचे अस्तित्व नसल्यासारखेच अाहे. काँग्रेस बी टीम असून ती शरद पवारच चालवतात. त्यामुळे उरले राहुल गांधी आणि शरद पवारच. आमच्यासमोर दुसरा नेताच नसल्याने आम्ही आमच्या भाषणात पवार यांच्यावर टीका करतो.’
    ‘माढ्यातून पराभव समाेर दिसू लागल्याने पवारांनी माघार घेतली. केवळ त्यांचाच पराभव होत आहे असे नाही तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव होणार आहे हे समोर दिसत असल्यानेच त्यांची सद्सद्विवेकबुद्धी संपुष्टात आल्यानेच पवारांची भाषा घसरत आहे,’ अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

Trending