आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार देखील उपमुख्यमंत्री विराजमान झाले. या राजकीय कलाटणीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. संध्याकाळी मुंबईतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मोदी है तो मुमकीन है. अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देणार असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला
फडणवीस म्हणाले की, मोदी है तो मुमकीन है. मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी मोदींचे आणि अमित शाहांचे आभार मानतो. आपली बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. अजित पवार समर्थनातून मजबूत सरकार देण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच मजबूतीने आणि भ्रष्टाचारमुक्त काम करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी पवार मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, विनोद तावडे यासंह इतर नेत्यांची उपस्थिती होती.
किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
आज परत एकदा फडणवीस सरकारने सत्ता स्थापने केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मजबूत सरकारची गरज होती. त्यामुळे आमचे हे नवे सरकार पुढील 5 वर्षांसाठी स्थिर सरकार राज्याला मिळेल, अशी प्रतिक्रीया भाजप नेते किरीट सोमय्याने यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.