आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devendra Fadnavis And Ajit Pawar Will Give Stable Government To The State Ravi Shankar Prasad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याला स्थिर सरकार देतील- रविशंकर प्रसाद  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलू नये. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही शिवसेनेनं भाजपविरोधात जाऊन काँग्रेसशी हातमिळवणी केली. बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श न ठेवणाऱ्यांना काय बोलावं ? असा खोचक टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगवला. राज्यातील सत्ता स्थापनेबाबत ते माध्यमांशी बोलत होते.रविशंकर प्रसाद म्हणाले की, बाळासाहेबांचे समर्पण आणि काँग्रेसविरोधी भूमिका सर्वानांच माहीत आहे. आता शिवसेना काँग्रेससोबत गेली. राज्यपालांनी सर्वानांच सत्ता स्थपानेची संधी दिली, पण कोणीच सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यामुळेच आज देवेंद्र फडणवीसांनी आज शपथ घेतली. महाराष्ट्राची जनता विचारतह होती, आम्ही युतीला स्पष्ट बहुमत दिले, पण सत्ता का स्थापन होत नव्हती. हे नवं समीकरण राज्याला एक स्थिर सरकार देईल.
निकालानंतर शरद पवार आणि काँग्रेसने अनेकदा आम्हाला जनतेने विरोधात बसायचा कौल दिला आहे, असे सांगत होते. काँग्रेसही हेच सांगत होती. पण मग नंतर हे तिघेही खुर्चीसाठी एकत्र आले. ही निव्वळ मॅच फिक्सिंग आहे, फक्त आणि फक्त खुर्ची मिळवण्यासाठी, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.राज्यात नवं सत्ता समिकरण तयार झालं. काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावर एकमत झालं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी कोणाला काही कळायच्या आत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपच्या या खेळीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...