आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप सरकार कोसळले!  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सत्ता स्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा -फडणवीस
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा

मुंबई - आमच्याकडे बहुमत उरलेले नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सत्ता स्थापनेपासून माघार घेतली आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजप आणि शिवसेनेने विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली. यामध्ये भाजपला जनमताचा कौल मिळाला. भाजपने 67 टक्के जागा जिंकत 105 आमदार निवडून आणले. तर सेनेच्या हाती लढवलेल्या जागांपैकी 40 टक्के जागा लागल्या. दुर्दैवाने ही युती सत्ता स्थापित करू शकली नाही. त्याचे कारण शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर अडून आम्हाला समर्थन देण्यास नकार दिला. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार हे कधीच ठरले नव्हते असा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. 

अजित पवारांनंतर मी देखील राजीनामा देण्याचा निर्णय घेतला -फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, की राज्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले होते. त्याचा आदर करत अजित पवार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापित केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मंगळवारी लागल्यानंतर अजित पवार यांनी माझी भेट घेतली. तसेच आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे राज्यपालांसमोर सिद्ध करण्यासाठी बहुमताचा आकडा नव्हता. त्यामुळेच, मला देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे.

प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावणार

शिवसेनेने भाजपवर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकून युतीला समर्थन देण्यास नकार दिला. परंतु, प्रत्यक्षात शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद देऊ असे आश्वासन कधीच देण्यात आले नव्हते. शिवसेनेने केलेला हा दावा खोटा आहे. यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापित करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. दोन चाकांवर गाडी चालते. परंतु, हे सरकार ऑटोरिक्शाप्रमाणे, चालणारे सरकार ठरू शकते. तरी सरकार स्थापित करणाऱ्यांना शुभेच्छा, आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावू असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...