आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचा भाजपला अादेश दिला अाणि त्याच वेळी फडणवीस सरकारचे अवसान गळाले. काही तरी 'चमत्कार' घडवून आणण्याची तयारी भाजपचे नेते करत असताना त्यांना पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांचा तंबू मात्र रिकामा झाला हाेता, त्यामुळे विधानसभेत पराभवातील नामुष्कीला सामाेरे जाण्याएेवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा मार्ग देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. तत्पूर्वी सकाळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला हाेता.
राजीनाम्याचा निर्णय फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. ते म्हणाले, 'जनतेने महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत दिले, परंतु शिवसेनेने न ठरलेल्या गोष्टी करण्यास सांगितले. ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू पाहत होते, परंतु आम्ही न ठरलेल्या गोष्टींसाठी तयार नव्हतो. त्यामुळेच आम्ही सत्तास्थापनेचे निमंत्रण नाकारले. शिवसेना आणि राष्ट्रवादीही राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. त्यामुळेच अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला अाहे.'
घाेडेबाजार करायचा नसल्याने राजीनामा : फडणवीस
आम्हाला कोणताही घोडेबाजारही करायचा नाही. केवळ राष्ट्रवादीचा गट आमच्याकडे आल्याने आणि पुरेसे संख्याबळ असल्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केली, असेही फडणवीस म्हणाले. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस राजभवनावर गेले आणि त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.