Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray in Nanded Rally

आता रताळ्याला म्हणतंय केळं, दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं; मुख्यमंत्री फडणवीसांची भोकरमध्ये राज ठाकरेंवर टीका

प्रतिनिधी | Update - Apr 14, 2019, 10:39 AM IST

‘तो’ करार अशोक चव्हाणांनीच केला - प्रचारार्थ शनिवारी विजयी संकल्प सभेत आरोप

 • Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray in Nanded Rally

  नांदेड - आपल्याकडे एक म्हण आहे ‘रताळ्याला म्हणतंय केळं, दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं.’ राज ठाकरेंची अवस्था सध्या अशी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. भोकर येथे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते.


  शुक्रवारी नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत ठाकरे यांनी मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. या टीकेचा खरपूस समाचार भोकर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांनाही टीकेचे लक्ष्य केले. अशोक चव्हाणांनी आता नवा पॅटर्न सुरू केला. आम्ही मंच, खुर्च्या भाड्याने आणतो. माणसं आणि नेता आम्हाला किरायाने आणावा लागत नाही. अशोक चव्हाणांनी मंच, खुर्च्या किरायाने आणल्याच. शिवाय माणसं, नेता आणि पक्षही किरायाने आणला. काय अवस्था झाली अशोकरावांची पाहा.

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाचीही कशी अवस्था पाहा. पहिले मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. नंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आता झाला उनसे उमेदवार नसलेली सेना. ज्या लोकांना पहिले कधी खेळताच आले नाही. जे पहिल्या बॉलवर आऊट झाले त्यांचे कोणी ऐकत नसते. अशोक चव्हाणांनी असे भाड्याने नेते आणून कितीही मोदींवर टीका करू द्या, ते रोज सेंच्युरी मारतात आणि जनता त्यांच्यासोबतच राहणार आहे. किरायाची माणसं आणून निवडणुका जिंकता येत नसतात, असेही फडणवीस म्हणाले. सभेला पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, ओमप्रकाश पोकर्णा आदी उपस्थित होते.

  ‘तो’ करार अशोक चव्हाणांनीच केला
  राज ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात दुष्काळ असताना गुजरातला पाणी विकले. यांना खेळायचे नाही. यांना काही पुराव्याची गरज नाही. मनात येईल ते बोलत सुटायचे. गुजरातला पाणी देण्याचा करार २०१० मध्ये झाला. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. त्यांनीच हा करार करून गुजरातला पाणी दिले. याउलट मी हा करार रद्द करून दिलेले आपल्या वाट्याचे पाणी परत आणले.

Trending