आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील गायींचा विमा, पशुधनासाठी जेनेरिक औषधी व रुग्णवाहिका देणार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - पशुपालकांना जनारांसाठी स्वस्तात औषधी उपलब्ध व्हावीत म्हणून जेनेरिक मेडिकल सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. तर आजारी पशुधनाला उपचार देण्यासाठी रुग्ण्वाहिका उपलब्ध करून दिली जाईल. राज्यातील सर्व गायींचा विमा शासकीय खर्चातून काढला जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देेवंेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. जालना येथील महापशुधन प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

 

शहरात गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील पशुधन प्रदर्शन भरले आहे. त्याचा समारोप सोमवारी मुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यंाच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन विभागाचे मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, संजय खोतकर आदींची उपस्थिती होती. या प्रदर्शनाचे संयोजक तथा पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पशुधन वाचवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्या. गरीब शेतकरी पशुधनाचा विमा काढू शकत नाही. त्यामुळे किमान गायींचा शंभर टक्के विमा सरकारने काढावा त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे खोतकर म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपये खर्च झाले तरी चालतील, मात्र प्रायोगिक तत्वावर तातडीने ही योजना सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले. उत्तम प्रतीच्या देशी गायींच्या प्रजातींची संख्या वाढली पाहिजे यासाठी औरंगाबाद येथे जनावरांची सिमेन सॉर्टेड लॅब उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एखादे जनावर आजारी असेल तर त्याला थेट शेतावर जाऊन उपचार देता यावे किंवा रुग्णालयात आणण्यासाठी मदत व्हावी म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. तर जनावरांची महागडी औषधी स्वस्तात उपलब्ध व्हावीत म्हणून जेनेरिक मेडिकल सुरू करण्याची परवागनी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी २४३ कोटींची योजना सुरू करण्यात आली असून त्यामाध्यमातून पशुधन व चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय पशुपालकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

 

खोतकरांच्या मागण्या 
प्रस्तावना करताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मराठवाड्यासाठी सिमेन साॅर्टेड लॅब, पशुधनासाठी अल्प दरात जेनेरिक औषधी, गायींचा शंभर टक्के विमा आणि अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे जनारांसाठी चारा सुरक्षा योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाला प्रस्ताव देण्याचे निर्देश देत अनेक घोषणा केल्या. 

 

पाच लाख लोकांनी भेट दिल्याचा दावा 
आपण प्रशासनाकडून याची माहिती घेतली असता दाेन दिवसांत पाच लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. तिसऱ्या दिवशी यात आणखी भर पडेल. २४ वर्षांपूर्वी असे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याच्या पाचपट हे प्रदर्शन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

 

२५० कोटींचे वाटप 
दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामाध्यमातून पाचशे कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. आतापर्यंत २५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित रक्कम लवकरच वाटप करण्यात येईल. यामाध्यमातून दूध व्यवसायाला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

मुख्यमंत्री पशुधन योजनेची घोषणा 
मागेल त्याला पशुधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 'मुख्यमंत्री पशुधन योजना' सुरू करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी याची घोषणा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले भाषण थांबवून, मंत्री महादेव जानकर हे एक घोषणा करणार आहेत असे सांगितले, त्यानंतर जानकरांनी ही घोषणा केली. 

 

सिमेन सॉर्टेड लॅब 
दुग्धोत्पादन वाढीसाठी महाराष्ट्र सरकारने सिमेन सॉर्टेड लॅब हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. यामाध्यमातून गायींपासून कालवड जन्माला येईल. त्यामुळे राज्यात गायींची संख्या वाढेल व पर्यायाने दूध उत्पादन वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशी प्रयोगशाळा औरंगाबादेत सुरू होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...