आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात फडणवीसांच्या पुढाकाराने शिवरायांच्या वंशजांचे मनाेमिलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय मांडके | सातारा अनेक वर्षे राष्ट्रवादीत असूनही एकमेकांचे ताेंडही न पाहणारे साताऱ्यातील माजी आमदार शिवेंद्रराजे व माजी खासदार उदयनराजे हे बंधू आता पुन्हा भाजपच्या माध्यमातून एकाच पक्षात आले आहेत. आता तरी त्यांच्यातील मतभेद संपतील का, असा प्रश्न सातारावासीयांना पडलेला हाेता. मात्र रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाेन्ही राजांना आपल्यासमवेत रथात एकत्र आणले. या सर्वांनी मिळून पाेवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्याच साक्षीने महाराजांच्या या वंशजांमध्ये आता मनाेमिलन झाल्याचा संदेश दिला. महाजनादेश यात्रा रविवारी साताऱ्यात आली. शिवेंद्रराजे व उदयनराजे या दाेघांनीही नुकताच भाजपत प्रवेश केल्याने दाेघांच्याही समर्थकांनी दणक्यात स्वागत केले. शिरवळ येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी शिवेंद्रराजे व उदयनराजे या दाेघांनाही रथावर घेतले तेव्हा उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये काॅलर उडवली. दरम्यान, जावळी मतदारसंघासाठी शिवेंद्रराजे व लाेकसभा पाेटनिवडणुकीसाठी उदयनराजेंच्या उमेदवारीची घाेषणा मुख्यमंत्र्यांनी सभेत केली.

यशवंतरावांचे विस्मरण : मुख्यमंत्र्यांनी पाेवई नाका येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. त्या वेळी महाजनादेश यात्रेची बस राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उभी होती. फडणवीस यशवंतराव चव्हाण पुतळ्याकडे न पाहता बसमध्ये चढले, त्यांना अभिवादनही केले नाही.

बातम्या आणखी आहेत...