आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड, सर्वपक्षीयांकडून अभिनंदन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी मात्र मी पुन्हा येईन म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र शिवेसनेसोबतची युती तुटल्यानंतर त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. आज विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची निवड झाली. त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. शनिवारी 169 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर उद्धव ठाकरेंच्या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान भाजपने मात्र कामकाज नियमाला धरुन होत नाही नसल्याचे म्हणत सभात्याग केला होता. यानंतर आज रविवारी विधानसभेत अधिवेशन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वपक्षीयांकडून अभिनंदन करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...