आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत अपूर्ण राहिलेली जनतेची स्वप्ने पूर्ण करण्याचे व्हिजन : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पूर्वी अनेक जण मुंबईला शांघाय करण्याचे बोलत होते, पण मुंबई ही मुंबई आहे. तिचे एक वेगळे कल्चर, स्पिरीट आहे. मुंबईचा एक वेगळा फ्लेवर आहे. हा फ्लेवर टिकवून ठेवून त्याला आणखी ॲक्सेसेबल करण्याचे काम करत आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. अशा लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई २.० या परिषदेत बोलताना सांगितले. शाहरुख खान याने आपण शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले. 

 

महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई २.० या परिषदेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले. 

 

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे मल्टिब्रँड शहर आहे. स्टार्टअपमध्ये देशात मुंबई अव्वल असून २५ टक्के स्टार्टअप एकट्या मुंबईत आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरू असून तेथे १६ टक्के स्टार्टअप आहेत. दिल्लीत १२ टक्के स्टार्टअप आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच फिनटेक, माहिती तंत्रज्ञान व स्टार्टअप राजधानी म्हणूनही उदयास येत आहे. वाणिज्यिक जागांची कमतरता आहे. पण नव्या विकास आराखड्यात यासाठी तरतूद केली आहे. 

 

मुंबईचा समुद्र पाहिल्यावर लाज वाटते : गडकरी 

मुंबईच्या रस्त्यावर एवढे पाणी साचते की, त्यावरूनच जलवाहतूक मार्ग सुरू होईल, अशी टीका करत नितीन गडकरी म्हणाले, एकीकडे मुंबईत पाण्यात बुडून लोक मरतात आणि दुसरीकडे मुंबई पालिकेचे काही हजार कोटींचे डिपॉझिट बँकेत आहे. तेव्हा मुंबईची सर्व सांडपाणी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. मुंबईत सध्या पायाभूत सोयी-सुविधांचा विकास होतोय, पण दुसरीकडे मात्र मुंबईचा समुद्र पाहिला की लाज वाटते. समुद्रातील पाणी इतके घाणेरडे आहे की त्याच्या शुद्धीकरणाची गरज असून हे अशक्य नसल्याचे ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...